शहर

बरं की मोहिते पाटलांनी भाजपाची राखली…

डी एस गायकवाड
अकलूज

  • महाराष्ट्रामधील कृषी उत्पन्न बाजार समित्यावर महाविकास आघाडीचे वर्चस्व दिसले असले तरी सोलापूर जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यावर भाजपचाच वरचष्मा दिसला आहे पण अकलूज येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजपाच्याच राज्य पातळीवर काम करणाऱ्या नेतेमंडळींनी ही बाजार समिती महाविकास आघाडीच्या ताब्यात देण्याचे ठरवले होते की काय अशी सध्या चर्चा सुरू आहे. पण मोहिते पाटलांनी आपल्या कणखर नेतृत्वाने भाजपाची आब राखली.. नाहीतर सदरची बाजार समिती देखील महाविकास आघाडीच्या नावावर पडली असती आणि त्यांच्यासोबत काम करणाऱ्या भाजपच्या नेते मंडळींनी मात्र ब्र काढला नसता. पक्षीय पातळीवर या निवडणुका लढवल्या जात नाहीत अशी आवई उठवली जात असली तरी शेवटी त्यांच्या राजकीय पक्षाचा विचार केला जातो आणि त्यावरच शिक्कामोर्तब धरला जातो. त्यामुळे मोहिते पाटलांनी भाजपाचा मान राज्यात वाढवला आहे. राज्यात भाजपासाठी वातावरण कसे का असेना सोलापूर जिल्ह्यात मात्र मोहिते पाटलामुळे भाजपाचा वारू सुसाट वेगाने धावताना दिसत आहे. या वेगाने वाहणाऱ्या वारूला भाजपातील काही मंडळी विरोध करत असतील तर त्यांचा समाचार पक्षातील वरिष्ठ पातळीवरील नेत्यांनी घेतला पाहिजे अशी मागणी सध्या भाजपा प्रेमी कार्यकर्त्यांमधून होताना दिसत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button