शहर

भोसे ता.पंढरपूर येथील इरफान तांबोळी यांची जलसंपदा विभाग सहाय्यक अभियंता पदी निवड झाल्याने माळीनगर ग्रामस्थ यांच्या वतीने सत्कार

माळीनगर प्रतिनिधी… रियाज मुलाणी 9921500780

पंढरपूर तालुक्यातील भोसे(करकंब) येथील इरफान ईनुस तांबोळी यांनी गरीब परिस्थितीतून अडचणीवर मात करत जीवनामध्ये काहीतरी करून दाखवायची जिद्द व उराशी बाळगुन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ४० वी रँक घेऊन उत्तीर्ण झाल्याने आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करून घवघवीत यश संपादन केले आहे

त्यामुळे समस्त पंचक्रोशीतून त्यांच्या वरती शुभेच्छांचा वर्षाव होत आहे त्यांनी मिळवलेल्या यशामुळे यांच्या मामाच्या गावी माळशिरस तालुक्यातील माळीनगर या ठिकाणी माळीनगर ग्रामस्थ व तांबोळी परिवार, वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला व पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या

याप्रसंगी व्यापारी संघटनेचे मार्गदर्शक शिरीष फडे, डॉ -असलम शेख, डॉ- कोकाटे सर, गजानन शिंदे, नाना काटे, सुभाष ताटे, सवतगव्हाण चे उपसरपंच अर्जुन (नाना )बंडगर, जोशी सर, तांबोळी अतार मुस्लिम समाजाचे अध्यक्ष हाजी आदमभाई तांबोळी, इरफान तांबोळी यांचे मामा जब्बारभाई तांबोळी, अमीर तांबोळी, आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button