शहर

तथागत गौतम बुद्ध यांच्या 2567 व्या जयंती निमित्तअकलूज येथे 3 मे पासून बुध्द महोत्सवाचे आयोजन

उपसंपादक——हुसेन मुलाणी
टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
मो.9730 867 448

जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणीक तथागत गौतम बुद्ध यांच्या 2567 व्या जयंती निमित्त अकलूज येथील सारनाथ बुद्ध विहार येथे बुधवार दि.3 मे ते शुक्रवार दि.5 मे 2023 दरम्यान बुद्ध महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.या तीन दिवसीय महोत्सवात समाज प्रबोधनाचे वेगवेगळे उपक्रम राबवले जाणार आहेत अशी माहिती बुद्ध महोत्सव समितीच्या वतीने दिली आहे .

सदर मोहत्सवास बुधवार दि.3 मे 2023 रोजी सायंकाळी 5.वा पूज्य भंते संघ पारनेर याच्या उपस्थितीत बुद्ध पूजा ,बुद्ध वंदना ,परित्राण पाठाने सुरुवात होणार आहे.तर सायंकाळी 7 वा भिमा तुझ्या जन्मामुळे महानायकाच्या महागाथेच महानाट्याचे सादरीकरण होणार आहे.गुरुवार दि.4 मे 2023 रोजी सायंकाळी 8 वा.डाँ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे (बार्टी) चे विभाग प्रमुख डाँ.सत्येंद्रनाथ चव्हाण यांचे महारांचा लष्करी व सांस्कृतिक इतिहास व समग्र भिमा कोरेगाव संग्राम या विषयावर प्रबोधन पर व्याख्यान होणार आहे.

शुक्रवार दि.3 मे 2023 रोजी तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंती दिनी पहाटे 5 वा बुद्ध पूजा,बुद्ध वंदना व सकाळ 6-00 वा बुद्ध पहाट सुप्रसिद्ध गायक विजय सरतापे आणि संच वालचंदनगर यांचा संगीतमय कार्यक्रम होणार आहे.सकाळी 9 वा.सामूहिक बुद्ध वंदना व गाथा पठण,धम्मदेसना,धम्मध्वजारोहण,बुद्ध पूजा व खीरदान असे कार्यक्रम होणार असून.सायंकाळी 5 वा बुद्ध प्रतिमेची अकलूज शहरातुन भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.

सदर मोहत्सवा दरम्यान होणाऱ्या सर्व कार्यक्रमास अकलूज व परीसरातील बौद्ध उपासकांनी बहुसंख्येने उपस्थित राहवे असे अहवान बुद्ध महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button