महाराष्ट्र

शिवसेना ही मर्द शिवसैनिकांच्या मनगटाच्या बळावर चालते आणि ती मनगटे मजबूत आहेत —अतुल भवर ,सोलापूर.

उपसंपादक ——–हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क मो. 97 30 867 448

कोण कुठेही जाऊदे सत्तेसाठी कोण कुठे गेला हे आता आपण पहायच नाही.सत्तेसाठी सगळे हापापले आहेत.जिथे आपलेच लोक गद्दार बनले तिथे दुसर्यांना काय दोष द्यायचा ? आपले आमदार हरामखोर निघाले पैशासाठी विकले गेले मातोश्रीशी ते बेईमान झाले मग उद्या कोणी दादा फुटूदे अगर कोणी पादा फुटूदे आपल्याला काही फरक पडत नाही.आम्ही आता एकच ठरविलं आहे कोणाला कुठे जायचं आहे त्यांनी खुशाल जावं त्यांना कोणी अडविणार नाही आम्ही आमच्या शिवसेनेला उद्धवसाहेबांना सोडून कुठे जाणार नाही.आमचा एकच पक्ष एकच नेता एकच विचार म्हणजे उद्धवसाहेब बाकीच्या गद्दारांना आम्ही गिनत नाही.

आमचा विरोधक भाजप आणि मिंधे गट आहे याला राजकारणात कस झोपवायच हे आम्ही शिवसैनिकांनी ठरविलं आहे ज्यांनी आमच्या पक्षाला संपविण्याच ठरविल त्यांना राजकारणातून सत्तेतून संपवणे हेच आमच लक्ष आहे.आम्ही लढत आहोत लढत राहू पण कोणासमोर घाबरून शरण जाणार नाही जे इडीला सीबीआयला घाबरून शरण गेले ते पळपुटे आहेत अशा पळपुट्यांच्या भरवशावर शिवसेना कधी चालत नाही शिवसेना ही मर्द शिवसैनिकांच्या मनगटाच्या बळावर चालते आणि शिवसैनिकांची मनगटे एवढी मजबूत आहेत की आख्खी दुनिया जरी शिवसेनेच्या विरोधात गेली तरी त्या दुनियेशी लढण्याची ताकद त्या मनगटात आहे.

भाजप देशावर राज्य करीत आहे महाराष्ट्रात सत्तेत आहे इतर राजकीय पक्षातील लोकांना धमकावून भाजपमधे ओढले जात आहे.जे भाजपला घाबरून पैसा आणि सत्तेसाठी स्वत:च्या पक्षाशी गद्दारी करीत आहेत त्यांच नामोनिशान भाजपच संपविणार आहे.पाठीत खंजीर खुपसणे हा भाजपचा इतिहास आहे अरे ज्या शिवसेनेने भाजपला ३० वर्ष साथ दिली त्या शिवसेनेच्या पाठीत या भाजपने खंजीर खुपसला मग इतर पक्ष तर कीस झाड की पत्ती है…फक्त गरज पडली की वापरा आणि टाकून द्या अशी नियत त्या पक्षाची आहे त्यामुळे आज जे त्यांच्याबरोबर गेले आहेत त्यांची मातीच होणार आहे ही काळ्या दगडावरील पांढरी रेघ आहे.

उद्धवसाहेबांच एक वाक्य मनाला चटका लावून गेल साहेब म्हणाले ‘मला एकट्यालाच भाजप सोबत लढाव लागेल’ साहेबांना आम्ही सांगू इच्छीतो की साहेब तुम्ही एकटे नाहीत लाखो करोडो शिवसैनिक तुमच्यासोबत आहेत.एक वेळ तुमच्यासाठी जीव देऊ पण तुम्हाला आम्ही कधी एकटे पडू देणार नाही.आख्खा देश भाजपच्या दबावाला बळी पडला असेल पण हा शिवसैनिक बळी पडणार नाही.तुम्ही आमच्यासाठी सर्वस्व आहात काही गद्दार आमदार,खासदारांनी तुम्हाला धोका दिला असेल पण या निष्ठावांत शिवसैनिकाने तुमची साथ कधी सोडली नव्हती ना सोडणार नाही.नामर्द लोक सत्तेपुढे झुकतात आम्ही शिवसेनेचे मर्द आहोत सत्तेला लाथ मारू सत्ता नाही मिळाली तरी चालेल पण साहेब आजन्म तुमच्यासाठी लढत राहू तुम्ही एकटे नाही लाखो शिवसैनिकांची ताकद,जिद्द,चिकाटी,कडवटपणा,कट्टरपणा तुमच्यासोबत आहे.

जय महाराष्ट्र.
अतुल श्रावण भवर,सोलापूर.
मो नं 9960090001.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button