महाराष्ट्र

जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादीत, अजित पवार यांचं स्पष्टीकरण

उपसंपादक——हुसेन मुलाणी
टाइम्हा 9 मराठी न्युज नेटवर्क
मो. 9730 867 448

कारण नसताना माझ्या आणि माझ्या सहकाऱ्यांबद्दल गैरसमज पसरवला जात आहेत. जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. या बातम्यांमध्ये कोणतंच तथ्य नाही, असं म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यांच्या भाजप प्रवेशाबाबतच्या चर्चांवर स्पष्टीकरण दिलं.

जोपर्यंत जिवात जीव आहोत, तोपर्यंत पक्षासोबत राहाणार. या चर्चा थांबवा, तुकडा पाडा, असं म्हणत अजित पवारांनी या चर्चांना पूर्णविराम दिला. ते मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. भाजप प्रवेशाच्या बातम्यांमध्ये काहीच तथ्य नाही माझ्याबाबत चुकीच्या बातम्या दाखवल्या जात आहेत. 40 आमदारांच्या सह्या घेतलेल्या नाहीत. आम्ही राष्ट्रवादीत राहणार आहोत. इतर राजकीय पक्षाचे नेते याबाबत बोलत आहेत मात्र मी त्याबाबत बोलणार नाही प्रत्येक मंगळवारी आमदार मला भेटतात, हे नेहमीचे आहे. अनेक आमदारांचं काम होतं म्हणून आले होते, त्याचा वेगळा अर्थ काढू नका

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button