मार्डी तालुका लोहारा येथील सरपंच व तंटामुक्तीचे अध्यक्ष श्रीमंत पाटील यांच्या वतीने इफ्तार पार्टी

उपसंपादक——- हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो . 97 30 867 448
मार्डी ता.लोहारा ,जि. उस्मानाबाद येथील हजरत ख्वाजा जैनुद्दीन चिस्ती( समर कंदी) यांच्या दर्गा परिसरात असलेल्या मशिदीमध्ये येथील सरपंच श्रीमंत (अण्णासाहेब) पाटील ,तंटामुक्तीचे अध्यक्ष प्रफुल्ल (आप्पासाहेब पाटील) तसेच चेअरमन प्रवीण( बाप्पा) पाटील यांच्या वतीने गावातील मुस्लिम बांधवांना इफ्तार पार्टीचे दिनांक 17 एप्रिल 2023 रोजी आयोजन करण्यात आले होते

इस्लाम धर्मात रमजान महिन्याला व या महिन्यातील रोजा ( उपवास ) ला अनन्यसाधारण महत्त्व असून या महिन्यात मुस्लिमांना महिन्याचे रोजे करणे अल्लाहने अनिवार्य केले असून त्या अनुषंगाने मुस्लिम बांधव एक महिन्याचे रोजे करत असतात त्यामुळे आपल्या देशाची संस्कृती एकमेकातील भाईचारा एकता बंधता टिकवण्यासाठी आजही आमचे हिंदू बांधव प्रयत्न करत असतात आपण पाहिले तर आज देशभरात समाजात अस्थिरता निर्माण करणारे अनेक नेते पाहत आहोत परंतु मार्डी येथील पाटील परिवारातील या बंधूंनी मुस्लिम बांधवांना इफ्तार पार्टी देऊन सामाजिक सलोखा अबाधित राखण्याचा प्रयत्न केला ही कौतुकास्पद बाब आहे म्हणून देशाला आज गल्ली ते दिल्ली पर्यंत अशा सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या नेत्यांची गरज आहे.

याप्रसंगी मुस्लिम बांधवा समवेत पाटील परिवारातील या तिन्ही बंधूंनी इफ्तार पार्टीचा आस्वाद घेतला तसेच त्यांच्या प्रयत्नातून ख्वाजा जैनदिन चिस्ती यांच्या दर्गा परिसरातील फ्लावर ब्लॉक साठी लोहारा उमरगा मतदार संघाचे आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या फंडातून दहा लाखाचा निधी उपलब्ध करून दिल्याने मुस्लिम समाजाच्या वतीने सादिक शेख यांनी त्या सर्वांचे आभार मानले.याप्रसंगी रोजा इफ्तार पार्टीला या पंचक्रोशीतील तमाम हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्र बसून आनंद घेतला




