राष्ट्रीय आय काँग्रेस यांच्या वतीने मोहोळ तहसिल कार्यालयावर मोर्चा…..

उपसंपादक——- हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो . 97 30 867 448
राष्ट्रीय आय काँग्रेस,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी निराधार निराश्रीत व्यक्ति विकास यांच्यावतीने मोहोळ तहसील कार्यालयावर सत्ताधारी भाजपा पक्षाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द व शासकीय गृह वरून राहुल गांधी यांना हाटवण्यात आले आहे तसेच महागाई विरोधामध्ये मोहोळ तहसील कार्यालयावर सोलापूर राष्ट्रीय काँग्रेस सोलापूर जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी निराधार निराश्रीत व्यक्ती विकास विभाग सोलापूर जिल्हाध्यक्ष सुरेश हावळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा काढण्यात आला व तहसीलदार प्रशांत बेडसे पाटील यांना निवेदन देण्यात आले.

प्रसंगी बोलताना सोलापूर जिल्हा काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील म्हणाले की देशामध्ये सर्वसामान्य जनता ही महागाईमुळे होरपळत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महागाईचा मा बोलने के लिए तयार नाहीत मोठमोठ्या उद्योगदारांचा विचार केला जातो परंतु सर्वसामान्य जनतेचा विचार केला जात नाही आज देशाचे नेते राहुल गांधी हे महागाई विरोधी पाऊल उचलल्याने त्यांच्यावर खासदारकी रद्द करण्याचे तसेच शासकीय गृह मधून त्यांना हलवण्याचे कटकारस्थान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. भूलथापा मारून सत्तेत आलेले हे सरकार येणाऱ्या निवडणुकीमध्ये पाय उतार करण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी माजी सभापती बाबासाहेब शिरसागर काँग्रेस नेते देवानंद गुंड पाटील, काँग्रेस नेते भीमराव बाळगे, महिला काँग्रेस अध्यक्षा शाईन शेख, मुन्ना हरणमारे, ओबीसी सदस्य कांतीलाल राऊत, माजी सरपंच बिलाल शेख जिल्ह्यातील काँग्रेस नेते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



