महाराष्ट्र

अजित पवार शरद पवारांविरुद्ध बंड करणार? 2004 पासून मनात खदखद.

उपसंपादक ——–हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448

१७ एप्रिल २०२३, गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपसोबत जात सत्तास्थापन करणार या चर्चेला उधाण आलं आहे. अशातच काल अजित पवार यांनी आमदार अपात्र ठरले तरी शिंदे सरकार स्थिर असल्याचे सांगत ‘मविआ’ नेत्यांच्या मनसुब्यांमधील हवाच काढून टाकली. त्यामुळे अजित पवार शरद पवारांविरुद्ध बंड करणार का? या प्रश्नाने राजकीय वर्तुळात जोर धरला आहे

अजित पवार शरद पवारांविरुद्ध बंड करणार अशी शक्यता वर्तवण्यात येत असतानाच मिळालेल्या माहितीनुसार अजित पवार यांनी दिवसभरातील सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. ते सध्या मुंबईत आहेत. तर शरद पवार आणि सुप्रिया सुळे बारामती मध्ये असल्याची माहिती आहे.

सध्याच्या राजकीय घडामोडींमुळे महाराष्ट्रातील काका पुतण्या वादाबाबत चर्चा पुन्हा सुरु झाली आहे. महाराष्ट्राला काका-पुतण्या वाद नवीन नाही. या वादाची कारणं राजकीय असल्याने महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारी असल्याचे सांगण्यात येत आहे

    खदखद  

२००४ साली विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र तेव्हा हातातोंडाशी आलेली मुख्यमंत्रिपदाची संधी पक्षाने दवडली होती. दरम्यान, २००४ साली मुख्यमंत्रिपदावर पाणी सोडणं ही सर्वात मोठी चूक होती. कुणालाही मुख्यमंत्री केलं असतं तरी चाललं असतं, असं विधान त्यांनी केलं.

या निवडणुकीत राष्ट्रवादीला 71 आणि काँग्रेसला 69 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळं मुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीकडे यायला हवं होतं. परंतु, शरद पवार यांनी त्यावेळी काँग्रेसबरोबर बोलणी करून महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद काँग्रेसला दिलं आणि त्याबदल्यात दोन कॅबिनेट व एक राज्यमंत्रिपद जास्तीचं घेतलं. त्यामुळं शरद पवार आणि अजित पवार यांच्या मतभेदाला सुरुवात झाली. त्यानंतर 2009 च्या निवडणुकीत सुद्धा तिकीट वाटपावरून शरद पवार आणि अजित पवार यांच्यात सौम्य स्वरूपाचे मतभेद झाले होते.

हे ही वाचा

अजित पवार पुन्हा कुठे गेले? पुण्यातला हा कार्यक्रम रद्द, राजकीय चर्चांना उधाण_

पुण्यात आज अजित पवार एका कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. पुरंदरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला शरद पवार, सुप्रिया सुळे यांचीही उपस्थिती आहे. मात्र अजित पवार यांनी कार्यक्रम टाळल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार शेतकरी मेळाव्याला येणार नसल्यामुळे आयोजकांनी आयत्या वेळी शरद पवार, सुप्रिया सुळेंना निमंत्रित केलं. अजित पवारांचा आज पुरंदर तालुक्याचा नियोजित दौरा होता. मात्र अजित पवारांनी पुरंदर दौरा अचानक रद्द केला. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button