सुरताल संगीत विद्यालयाच्या वतीने करमाळा येथे शास्त्रीय संगीत कार्यशाळा संपन्न. माननीय विलासरावजी घुमरे तसेच गणेश करे पाटील यांची प्रमुख उपस्थिती

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
करमाळा येथील कमला भवानी बहुउद्देशीय संस्था करमाळा संचलित सुरताल संगीत विद्यालयाच्या वतीने शास्त्रीय संगीत गायन व तबला वादन या विषयाची एक दिवशीय कार्यशाळा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या विजयश्री सभागृहात सकाळी नऊ ते सायंकाळी सात या वेळेत संपन्न झाली.

कोलकत्ता येथील प्रसिद्ध शास्त्रीय युवा गायिका आद्रीजा बसू आणि पुणे येथील प्रसिद्ध युवा तबलावादक सुखशांत पाटील यांनी व्याख्यान आणि प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून शास्त्रीय संगीत, गायन, तसेच तबला विषयाचे मार्गदर्शन केले आहे. यावेळी कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे विद्या विकास मंडळाचे सचिव मा श्री विलासराव घुमरे , यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा श्री गणेश भाऊ करे पाटील, अर्बन बँकेच्या संचालिका सौ सुनीता देवी मॅडम, विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष मिलिंद फंड, डॉ. वसंतराव पुंडे , कोमल ताई घुमरे, इत्यादी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली .

यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यामध्ये डॉ प्रचिती पुंडे (पुणे) यांना सुरताल करमाळा भूषण पुरस्कार, आद्रीजा बसू (कोलकत्ता) यांना सुर सरस्वती पुरस्कार तर सुखशांत पाटील (पुणे) यांना बाबुराव महाराज तालश्री पुरस्कार देण्यात आला. या कार्यशाळेसाठी सोलापूर, पुणे, बीड व धाराशिव जिल्ह्यातील एकूण सव्वाशे प्रशिक्षणार्थी नी आपला सहभाग नोंदवला.

कार्यशाळेची सांगता गायिका अद्रीच्या बसू यांच्या राग यमन मधील बडा ख्याल, छोटा ख्याल आणि भजन गायनाने करण्यात आली. त्यांना हार्मोनियम साथ बाळासाहेब नरारे यांनी तर तबला साथ सुखशांत पाटील यांनी केली. सूत्रसंचालन रेश्मा जाधव तर आभार डॉ. स्वाती घाडगे यांनी मानले. अशी माहिती विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष मा श्री बाळासाहेब नरारे यांनी दिली आहे.



