महाराष्ट्र

सिकंदरभाई शेख यांची हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (श प) गटाच्या “ज्येष्ठ नागरिक सेल” च्या उपाध्यक्ष पदी निवड…

आमीर मोहोळकर
टाइम्स 9 न्यूज अकलूज
9890299499

आपल्या पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्यातील उरळी कांचन येथील पुरोगामी विचाराचे सिकंदरभाई जानमहम्मद शेख यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या “ज्येष्ठ नागरिक सेल” च्या तालुका “उपाध्यक्ष” पदी निवड झाल्याचे पत्र सेलचे जिल्हा अध्यक्ष शिवाजीराव लक्ष्मण कांचन यांनी आज जाहीर केले…

या वेळी टाइम्स 9 न्यूज शी बोलताना सिकंदरभाई शेख म्हणाले की,देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब यांच्या नेतृत्वा मधे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जोमाने काम करीत असून “ज्येष्ठ नागरिक सेल” च्या हवेली तालुका उपाध्यक्ष पदी माझी निवड झाल्याने येणाऱ्या काळात आपण सुद्धा सर्व ज्येष्ठ नागरिकांना सोबत घेऊन पक्षाचे काम आणखी जोमाने करणार असल्याचे त्यांनी सांगितले…

पुढे बोलताना ते असे हि म्हणाले की,शरदचंद्र पवार साहेब यांचे पुरोगामी विचार समाजाच्या शेवटच्या घटकां पर्यंत पोहोचवणार असून या साठी सेलच्या सर्व ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन नूतन उपाध्यक्ष सिकंदरभाई शेख यांनी केले…

सिकंदरभाई शेख यांच्या निवडीचे पत्र देते वेळी हवेली तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बहुसंख्य “ज्येष्ठ नागरिक”तसेच पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते,त्यांच्या निवडीने उरळी कांचन येथील पदाधिकाऱ्यांनी त्यांना पुढील कारकिर्दीच्या शुभेच्छा दिल्या…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button