शहर

मोखाडा पोलीस ठाणे हद्दीत महिलेचा गळा आवळून खून.. आरोपींना जेरबंद करण्यात पालघर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांच्या पथकाला यश

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640

प्रेम संबंधातून एका नेपाली महिलेचा गळा आवळून तिला जीवे ठार मारून तिचा मृतदेह एका गोणीत भरून नदीत फेकून देणाऱ्या प्रियकरासह अन्य दोन साथीदारांना जेरबंद करण्यात पालघर स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील आणि मोखाडा पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमनाथ ढोले यांच्या पथकाला यश आले आहे.

मुळगाव नेपाल पण सिलवासा येथे राहणारी (27) वर्षीय काजल गुप्ता आणि ( 24) वर्षीय राजकुमार वरहा यांचे गेल्या दोन वर्षापासून प्रेम संबंध होते. यामुळे काजलने राजकुमारच्या मागे लग्नाचा तगादा लावला होता. यातून बाहेर पडण्यासाठी 1 एप्रिल 2025 रोजी (1) राजकुमार वरहा (प्रियकर ) वय वर्ष (24) राहणार नेपाळ (2) बालाजी वाघमारे वय वर्ष (34) राहणार खालापूर जिल्हा धाराशिव (3) सुरेश सिंग वय वर्ष ( 50) राहणार सिलवासा या तिघांनी मिळून कापडी स्कार्पच्या सहाय्याने तिचा गळा आवळून तिला जीवे ठार मारून तिचा मृतदेह एका सुतलीच्या गोणीमध्ये भरून मोखाडा पोलीस ठाणे हद्दीतील घाटकर पाडा येथील वाघ नदीच्या पुलाखाली फेकून दिला होता.

या बाबीचे गांभीर्य लक्षात घेऊन पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरळे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणपत पिंगळे (जव्हार विभाग ) यांच्या मार्गदर्शनाखाली पालघर स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमनाथ ढोले मोखाडा पोलीस ठाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल व्हटकर, पोलीस उपनिरीक्षक रोहित खोत,पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल सावंत देसाई, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र वानखेडे, पोलीस उपनिरीक्षक सुनील नलावडे, सहाय्यक पोलीस हवालदार सुनील माळी, पोलीस हवालदार दीपक राऊत, पोलीस हवालदार संदीप सूर्यवंशी, पोलीस हवालदार नरेंद्र पाटील, पोलीस हवालदार दिलीप जनाठे, पोलीस हवालदार संतोष निकोले, पोलीस हवालदार संजय धंगडा, पोलीस हवालदार विजय ठाकूर, पोलीस हवालदार कैलास पाटील, पोलीस हवालदार दिनेश गायकवाड, पोलीस नाईक कैलास केंगार (स्थानिक गुन्हे शाखा ) या पथकानी सबल गुन्ह्याचे पुरावे उपलब्ध नसताना देखील तांत्रिक माहितीच्या आधारे या तिन्ही आरोपींना मंगळवार दिनांक 8 एप्रिल 2025 रोजी अटक करून जेरबंद केले आहे.

याबाबत अधिक तपास मोखाडा पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमनाथ ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली मोखाडा पोलीस करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button