महाराष्ट्र

पालघर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांच्या पथकाची कारवाई… बोईसर येथून 12 किलो गांजा सह झारखंडच्या तरुणाला अटक

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640

पालघर जिल्ह्यातील बोईसर येथील धोडीपूजा मयूरधोडी चाळीत अवैधरीत्या अंमली पदार्थांची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती पालघर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांना प्राप्त झाल्यावर त्यांनी पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, आणि अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरळे यांच्या मार्गदर्शनाखाली शोध पथक तयार करून बोईसर धोडीपूजा मयूरधोडी चाळीत सोमवार दिनांक 30 जून 2025 रोजी रात्री 11.50 वाजता छापा टाकून पंजू समरा कुजर वय वर्ष (35) मुळगाव राहणार मांडर, जिल्हा- रांची, झारखंड याला 1 लाख 27 हजार रुपये किमतीच्या 12 किलो 780 ग्रॅम वजनाच्या गांजा सह अटक करून मंगळवार दिनांक 01 जुलै 2025 रोजी बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे .
याबाबत पुढील तपास बोईसर पोलीस ठाणे पोलीस उपनिरीक्षक महेंद्र गावडे करत आहेत.

सदरची यशस्वी कारवाई पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरळे, परि. पोलीस अधीक्षक बोईसर डॉ.भागीरथी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पालघर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल व्हटकर, पोलीस उपनिरीक्षक गोरखनाथ राठोड, पोलीस हवालदार कैलास पाटील, नरेंद्र पाटील,विजय ठाकूर, संजय धांगडा,संदीप सूर्यवंशी, दीपक राऊत, पोलीस अंमलदार प्रशांत निकम या पथकाने केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button