देश-विदेश

महसूल विभागातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याची माजी आमदार पाटील यांनी केली तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे मागणी

करमाळा प्रतिनिधी

अलीम शेख

मोबाईल नंबर 98 50 68 63 60

माजी आमदार नारायण पाटील यांनी तहसीलदार शिल्पा ठोकडे यांची भेट घेऊन महसूल विभागाकडील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याबाबत एक निवेदन दिले असून सातबारा उताऱ्यावरील चूक दुरुस्तीसह अनेक कामांचा विषय मांडला. यावेळी त्यांचे समवेत बाजार समिती सदस्य नवनाथ झोळ, सभापती अतुल पाटील, उपसभापती दत्ता सरडे, गहिनीनाथ ननवरे, बिभीषण आवटे, भाजपा नेते अमरजीत साळुंके, शिवसेना तालुकप्रमुख देवानंद बागल, भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा अर्जुनराव सरक, चिखलठाणचे सरपंच विकास गलांडे, माजी सरपंच हनुमंत सरडे, तरटगाव सरपंच तथा कुकडी संघर्ष समितीचे प्रमुख डॉक्टर अमोल घाडगे, बहुजन संघर्ष सेनेचे प्रमुख राजाभाऊ कदम, एन पी सोशल मीडिया वॉर रूम सदस्य दिग्विजय अंबारे, संजय तनपुरे, स्वीय सहायक सूर्यकांत पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी सादर केलेल्या निवेदनात माजी आमदार नारायण पाटील यांनी करमाळा तालुक्यातील कलम १५५ अन्वये ७/१२ उताऱ्यावरील चूक दुरुस्ती प्रकरणे व फेब्रुवारी २०२३ पासून प्रलंबित असलेली रस्ता प्रकरणाचा निपटारा होणेबाबत विनंती केली आहे.करमाळा तालुक्यातील तहसिल कार्यालयाकडे नागरिकांनी ७/१२ उताऱ्यावर झालेल्या कलम १५५ अन्वये चूक दुरुस्तीची अंदाजे ७०० ते ८०० प्रकरणे प्रलंबित आहेत. शेतकरी व ग्रामस्थ चूक दुरुस्ती होण्यासाठी आपल्या कार्यालयाकडे अनेक  वर्षापासून हेलपाटे मारत आहेत. त्यांच्या उताऱ्यावर चूक असल्यामुळे त्यांना कोणतीही बँक कर्ज देत नाही. तसेच जमीन, जागा खरेदी, विक्रीसाठी त्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे अशी खंत या निवेदनातून पाटील यांनी व्यक्त केली.तसेच फेब्रुवारी २०२३ पासून आपल्या कार्यालयाकडे अंदाजे ३०० ते ४०० रस्ता प्रकरणे प्रलंबित आहेत. काही रस्ता केसेसवर सुनावण्या होऊनही स्थळ पहाणी झालेल्या नाहीत. काही शेतकऱ्यांना रस्ता नसल्यामुळे त्यांना त्यांचा शेतमाल शेतातून बाहेर आणणे गैरसोयीचे होत असून  त्यांची आर्थिक व मानसिक हानी होत आहे. रस्ता केसेसचा स्थळ पहाणी व हद्द खुणा दर्शवून निपटारा वेळेत केल्यास दोन शेतकऱ्यातील वाद संपुष्टात येऊन त्यांचे नुकसान वाचवता येईल याबाबत आपण महसूल विभागास अधिक कार्यरत होण्यास सूचना द्याव्यात ही मागणी पाटील यांनी केली. यावेळी रेशन कार्ड, धान्य वितरण, संजय गांधी निराधार योजनेतील समाविष्ट लाभार्थी आर्थिक मदत, नवीन लाभार्थी नावे, शेतकऱ्यांना शासनाकडून मंजूर झालेल्या मदतीबाबत आदी इतर महत्वाच्या विषयावर माजी आमदार नारायण पाटील यांनी साविस्तर चर्चा केली. या भेटी दरम्यान संजय तनपुरे यांना कुणबी दाखला तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी मान्यवरांचे उपस्थितीत दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button