महाराष्ट्र

करमाळा व इंदापूर तालुक्यातील साखर कारखान्याच्या ऊस बिलासाठी बहुजन संघर्ष सेनेने काढला करमाळ्यात रिमझिम पावसात आक्रोश मोर्चा

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60

मकाई कमलाई घागरगाव साखर कारखान्यांनी उसाची बिले शेतकऱ्यांना द्यावीत म्हणून बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या नेतृत्वाखाली करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी आक्रोश मोर्चा काढला मोर्चा चालू असताना करमाळ्यामध्ये पाऊस चालू होता परंतु पावसाची तमा न बाळगता पावसात भिजत भिजत मोर्चा हजारोच्या संख्येने तहसील कचेरी वरती धडकला मोर्चाला मार्गदर्शन करताना राजाभाऊ कदम म्हणाले मकाई आणि कमलाई कारखान्यावरती आर आर सी प्रमाणे कारवाई करण्याचे आदेश साखर आयुक्त यांनी तहसीलदारांना दिलेले आहेत

मात्र दोन महिने झाले तहसीलदार यांनी मकाई व कमलाई कारखान्यावरती काय कायदेशीर कारवाई केली याचे उत्तर तहसीलदार यांना मागितले जिल्हाधिकारी यांना दोन्ही कारखान्याची साखर जप्त करून तिचा निलाव करून शेतकऱ्यांच्या उसाची बिले देण्याचे आदेश साखर आयुक्त यांनी दिलेले आहेत मात्र तहसीलदार साहेब राजकीय दबावापोटी मकाई कमलाई साखर कारखान्यावर ती कारवाई करत नाहीत म्हणून शेतकऱ्यांना बिले मिळत नाहीत असा तहसीलदार यांच्या वरती राजाभाऊ कदम यांनी आक्षेप घेतला

मोर्चेकर्‍यांचे निवेदन स्वीकारायला नायब तहसीलदार निकम साहेब आले मकाई कमलाई साखर कारखान्याचे प्रतिनिधी आले परंतु मोर्चेकर्‍यांचे समाधान झाले नाही म्हणून तहसील कचेरी समोरून उठणार नाही असा पवित्रा राजाभाऊ कदम यांनी घेतला आखेर नायब तहसीलदार निकम यांनी कमलाई मकाई कारखान्यांना कारवाईबाबतच्या नोटिसा काढलेल्या आहेत असे लेखी पत्र दिले मकाई कारखान्याने पंधरा दिवसात उसाची बिले काढणार असलेचे चेअरमनच्या सहीने लेखी पत्र दिले व कमलाई कारखान्याने तहसीलदार यांनी आमच्यावरती कारवाई करून साखरेचा निलाव करून शेतकऱ्यांचे पैसे देण्याची व्यवस्था करावी

अशा पद्धतीचे लेखी पत्र दिले यावरही राजाभाऊ कदम व शेतकऱ्यांचे समाधान झाले नाही जर पंधरा दिवसात पैसे मिळाले नाहीत तर साखर आयुक्ताच्या समोर धरणे आंदोलन करणार असा निर्णय घेतला व शेतकऱ्यांच्या वतीने कोर्टामध्ये याचिका दाखल करण्याचाही निर्णय राजाभाऊ कदम यांनी शेतकऱ्याच्या सहमतीने घेतला .
यावेळेस राष्ट्रवादीचे राजकुमार देशमुख, प्रहारचे संदीप तळेकर, राष्ट्रीय समाज पक्षाचे अंगद देवकते, बौद्ध महासभेचे सुहास ओहोळ ,शाहीर शिवाजी कांबळे , श्रीकांत मार्कड यांची भाषणे झाली

यावेळेस दत्ता गव्हाणे लालासाहेब काळे सुंदरदास काळे संदीप मारकड रवी घोडके विष्णू रंधवे अंगद लांडगे आप्पा भोसले रमेश भोसले कालिदास कांबळे मच्छिंद्र गायकवाड आधी बहुसंख्या कार्यकर्ते शेतकरी उपस्थित होते

ऊस बिलासाठी मात्र तारीख पे तारीख शेतकऱ्यांच्या पदरी अद्यापही निराशाच

मकाई व कमलाई तसेच घागरगाव साखर कारखान्याच्या ऊस बिलासाठी यापूर्वीही बहुजन संघर्ष सेनेने मोर्चाचे आयोजन केले होते मात्र संबंधित साखर कारखान्याच्या नेत्यांनी फक्त वेळ काढूपणा तसेच तारीख पे तारीख अशा पद्धतीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची अक्षरशा बोळवण केली आहे तेव्हा साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची उसाची बिले तरी द्यावी अशी मागणी शेतकरी वर्ग मधून देखील जोर धरू लागली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button