रा कॉ शरद पवार पक्षाच्या अल्पसंख्याक विभाग महाराष्ट्र प्रदेश “महासचिव” पदी अकलूज चे ॲड वजीर शेख यांची निवड…

आमीर मोहोळकर,प्रतिनिधि,टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499
ॲड वजीर शेख यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट अल्पसंख्याक विभागाच्या महाराष्ट्र प्रदेश “महासचिव” पदी निवड झाल्याचे पत्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील साहेब आणि ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील साहेब यांच्या मान्यतेने देण्यात आले…

माळशिरस तालुका अल्पसंख्याक विभागाच्या मुस्लीम चळवळीच्या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय कार्यात अग्रेसर असणाऱ्या ॲड वजीर शेख यांची निवड झाल्याने अकलूज आणि माळशिरस तालुक्यातील अल्पसंख्याक समाजातील अनेक कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा देत अभिनंदनाचा वर्षाव केला…

टाइम्स 9 शी बोलताना ॲड वजीर शेख असे हि म्हणाले की,भविष्यात महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अल्पसंख्याक विभागाच्या माध्यमातून राज्यामध्ये अनेक समाज उपयोगी कार्यक्रम हाती घेणार असुन

मुस्लिम समाजाच्या चळवळीतील जे कार्यकर्ते इमाने इतबारे संघटनेच्या कार्यप्रणाली मध्ये काम करु इच्छित असतील त्यांनी पक्षाच्या ध्येय धोरणांची माहिती तळागाळापर्यंत पोहविण्यासाठी एकत्र यावे आणि जातीय वादी पक्षाला महाराष्ट्राच्या सत्ते पासुन दुर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती दिली…

पुढे बोलताना वजीर शेख असेही म्हणाले की मला महासचिव पदाचे निवडीचे पत्र मिळाले त्यावेळेस मी पुण्याहून अकलूज कडे मार्गस्थ होत असताना टाइम्स 9 चे मुख्य संपादक नौशाद मुलाणी यांच्याशी योगायोगाने माझी फोनवर बातचीत झाली आणि ते ही योगायोगाने दौंड तालुक्यातील वरवंड या गावी होते त्यांनी व त्यांचे भाऊजी अब्दुल शेख यांनी त्यांच्या निवासस्थानी मला बोलावून प्रथम माझा सत्कार केला आणि माझ्या पुढील कारकिर्दीस शुभेच्छा हि दिल्या…

मोहिते पाटील गटाचे समर्थक आणि माळशिरस तालुका मुस्लिम समाजाचे नेते ॲड वजीर शेख यांची शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभाग महाराष्ट्र प्रदेश “महासचिव” पदी निवड झाल्याने अकलूज आणि माळशिरस तालुक्या सह सोलापूर जिल्ह्यातील मुस्लिम समाजाने हि आनंद व्यक्त करत ॲड वजीर शेख यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला…



