ॲड वजीर शेख यांचा अकलूज च्या दर्गा मशीद कमिटी च्या वतीने सत्कार…
आमीर मोहोळकर,प्रतिनिधि,टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499
ॲड वजीर शेख यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट अल्पसंख्याक विभागाच्या महाराष्ट्र प्रदेश “महासचिव” पदी निवड झाल्याचे पत्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील साहेब आणि ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील साहेब यांच्या मान्यतेने पक्षाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान यांच्या हस्ते देण्यात आले…
माळशिरस तालुका अल्पसंख्याक विभागाच्या मुस्लीम चळवळीच्या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय कार्यात अग्रेसर असणाऱ्या ॲड वजीर शेख यांची निवड झाल्याने अकलूज येथील दर्गा मशीद कमिटी च्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला…
मोहिते पाटील गटाचे कट्टर
समर्थक आणि माळशिरस तालुका मुस्लिम समाजाचे नेते ॲड वजीर शेख यांनी आपल्या उमेदीच्या काळात मुस्लिम समाजातील सामाजिक चळवळीची सुरुवातच अकलूज येथील दर्गा मशीद येथील कार्यकर्त्या सह केली होती…
या वेळी हुसेनभाई शेख.बादशाहभाई शेख,सलीम सय्यद,रशीद शेख,कलीम फकीर,इन्नुस शेख,रियाज तांबोळी,इब्राहिम मुलाणी,हमीद मुलाणी यांच्या सह बहुसंख्य मुस्लिम बांधव उपस्थित होते…