करमाळा सहाय्यक निबंधक पदी श्रीमती अपर्णा यादव रुजू .बाजार समितीचे सचिव विठ्ठल क्षीरसागर यांनी केला त्यांचा सत्कार
करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
“उपनिबंधक सहकारी संस्था गट -अ” या संवर्गातील परीविक्षाधीन अधिकारीश्रीमती अपर्णा यादव यांची प्रशिक्षण कालावधीमध्ये सहाय्यक निबंधक सहकारी संस्था करमाळा या पदी नियुक्ती झालेली आहे .एकत्रित परीविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम मधील परीविक्षाधिन उपनिबंधक सहकारी संस्था गट – अ यांना लगतपूर्व सहायक निबंधक सहकारी संस्था गट -ब या पदाचा स्वतंत्र पदभार सोपविणे बाबत सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे दिपक तावरे यांनी नुकतेच आदेश पारित केलेले होते .
यामध्ये सहाय्यक निबंधक करमाळा या रिक्तपदी दिनांक २ सप्टेंबर ते २७ डिसेंबर या कालावधीसाठी श्रीमती यादव यांची करमाळा येथे नियुक्ती झाली आहे .श्रीमती यादव आज सहाय्यक निबंधक कार्यालय करमाळा येथे रुजू झाल्या .
या प्रसंगी त्यांचा सहाय्यक निबंधक कार्यालय करमाळा , कृषी उत्पन्न बाजार समिती करमाळा ,सर्टिफाईड ऑडिटर्स ,गट सचिव संघटना ,खरेदी – विक्री संघ करमाळाआदींच्या वतीने स्वागत व सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या .यावेळी प्रभारी सहाय्यक निबंधक उमेश बेंढारी ,गट सचिवांचे समन्वयक सचिव बबनराव मेहेर ,बाजार समितीचे सचिव विठ्ठल क्षीरसागर ,सहाय्यक सचिव रविंद्र उकिरडे ,प्रमाणित लेखापरीक्षक उदय सुरवसे , संजय ठेंगडे ,गट सचिव अनिल सुरवसे आदी उपस्थित होते प्रास्तविक व सूत्रसंचालन अशोक नरसाळे यांनी केले तर आभार विष्णू माने यांनी मानले.