महाराष्ट्र

अकलूज येथे”शासन आपल्या दारी” अभियानांतर्गत 17 जून रोजी तालुकास्तरीय शिबिराचे उद्घाटन

उपसंपादक —-हुसेन मुलाणी
टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो . 97 30 867 448

महसूल व वन विभाग महाराष्ट्र शासन ,जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर अंतर्गत -तहसील कार्यालय -माळशिरस, तसेच माळशिरस तालुक्यातील सर्व शासकीय विभाग /कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने” शासन आपल्या दारी” अभियाना अंतर्गत तालुकास्तरीय महाशिबिराचे उद्घाटन समारंभ शनिवार दि. 17 जून 2023 रोजी सकाळी 10 वाजता “कृष्णप्रिया मल्टी फंक्शन हॉल” –अकलूज येथे आयोजित केले असून

या शिबिराच्या अध्यक्षस्थानी माढा लोकसभेचे खासदार रणजीतसिंह निंबाळकर उद्घाटक म्हणून आमदार रणजितसिंह मोहिते पाटील तर प्रमुख उपस्थितीत आमदार राम सातपुते, आणि प्रमुख मार्गदर्शक प्र .जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे तरी नागरिकांनी या शिबिरास उपस्थित रहावे असे आवाहन उपविभागीय अधिकारी माळशिरस विभाग नामदेव टिळेकर ,माळशिरसचे तहसीलदार -अमरदीप काकडे यांनी केले आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button