महाराष्ट्र

मोहिते पाटील गटाने घेतलेला सावध पवित्राच भाजपाची धडकी भरवणारा ठरणार…

आमीर मोहोळकर
प्रतिनीधी,टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क,अकलूज मो.नंबर:-9890299499

ज्या ज्या वेळेस लोकसभेच्या निवडणुका डिक्लेर झाल्या त्या त्या वेळी माढा लोकसभा मदारसंघ हाच चर्चेचा विषय ठरला,हे आपण 2009 पासूनच पाहत आहोत,परंतु आज पर्यंत झालेल्या निवडणुका हे वेगळ्या ठरल्या पण 2024 ची निवडणूक हि वेगळ्याच दिशेने जात आहे हे आपण सर्व जण पाहतोय…

माढा लोकसभेच्या प्रत्येक निवडणुकीत केंद्र स्थानी असणाऱ्या मोहिते पाटील गटाने सांगोला,करमाळा,माढा तालुक्यात दौरे सुरू ठेऊन विरोधकांना एक प्रकारे इशाराच दिला असून,त्यामुळे भाजपा च्या गोटात अस्वस्थता निर्माण झाल्याचे जनतेतून बोलले जात आहे…

माढा लोकसभेची उमेदवारी फलटण च्या रणजितसिंह निंबाळकर यांना जाहीर करून आपण घाईच केली,असे पक्ष नेतृत्वाला वाटणे आता तर स्वाभाविकच आहे…

भाजपा ने हि उमेदवारी जाहीर करायला हरकत हि नव्हती पण त्या अगोदर विजयसिंह मोहिते पाटील आणि रामराजे निंबाळकर साहेब यांना विश्वासात घेणे हे हि अत्यंत महत्त्वाचे होते,असो आता जाहीर झालेल्या उमेदवारी बद्दल माढा लोकसभा मतदार संघात जो गोंधळ निर्माण झाला आहे तो कधी शांत होणार याकडे सबंध महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे…

परवा अकलूज मध्ये शेकाप चे भाई जयंत पाटील यांनी बोलताना अकलूज च्या या भुमी ने भूतकाळात हि कलाटणी देणारे निर्णय घेतले असुन भविष्यात हि अकलूज करांचा निर्णय हा महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारा असेल असे भाकीत केले होते…

तुर्तास तर एवढे मात्र खरे आहे की मोहिते पाटलांनी घेतलेला सावध पवित्रा हा महाराष्ट्र भाजपा च्या धडकी भरवणारा ठरणार यात तिळमात्र शंका असण्याचे कारण नाही,असे हि जनतेतून बोलले जात आहे…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button