शहर

इंदापूर तालुक्यातील करेवाडी येथे जमिनीच्या वादातून , लोखंडी रॉड कुराड, कोयता, आदिने मारहाण

टाइम्स 9 मराठी न्युज

करेवाडी ता .इंदापूर जि. पुणे च्या हद्दीत शकुंतला गोफणे यांच्या घराजवळ करेवाडी ते फिर्यादीच्या जमीन गट नंबर 44 मधील शेताकडे जाणाऱ्या रोडवर 15/ 2 /2023 रोजी आरोपी दादासो मोहन करे ,अनिल मोहन करे, अभिमान ज्ञानदेव करे ,मोहन महादेव करे, हे सर्व रा. करेवाडी ता. इंदापूर जि. पुणे व अनोळखी तीन इसम यांनी फिर्यादीच्या जमीन गट नंबर 44 चे दिवाणी दाव्याचे कारणावरून सोमनाथ सुभान करे वय 23 वर्षे व्यवसाय (नोकरी )

हल्ली रा. त्रिमूर्ती नगर, आनंदी निवास -बारामती जि. पुणे मुळगाव रा. करेवाडी ता. इंदापूर जि.
पुणे व त्याचे वडील सुभान महादेव करे वय 60 वर्ष यांना शिवीगाळ दमदाटी करून आरोपीने फिर्यादी सोमनाथ करे यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून तसेच वडील- सुभान करे आई- बायडाबाई, भाऊ -राहुल, यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने लोखंडी रॉड, कुऱ्हाड, कोयता, गज ,लाकडी काठ्याने मारहाण करून गंभीर दुखापत केली आहे

म्हणून वरील इसमाविरुद्ध कायदेशीर तक्रार आहे वगैरे मजकुराचा जवाब अश्विनी हॉस्पिटल अकलूज येथून आल्याने इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 228 /2023 भारतीय दंड विधान कलम 307, 326 ,504, 506, 143, 147, 148 ,149 ,प्रमाणे गुन्हा नोंद झाला असून प्रभारी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक पवार व दाखला आमदार म्हणून पोलीस उपनिरीक्षक देठे आणि पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक माने करतात आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button