शहर

वाडा वनपाल विजय धुरी व विष्णू सांगळे दारूच्या खंब्याची लाच स्वीकारताना पोलीस उपअधीक्षक नवनाथ जगताप यांच्या जाळ्यात अटक

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640. पालघर जिल्हा वृत्तांत

शेतीची जमीन बिनशेती म्हणजे एन.ए करण्याकरिता बांधकाम व्यवसायिकाच्या मॅनेजर कडे दहा हजार रुपयांची लाच आणि पिण्याकरिता रॉयल स्टॅग दारूच्या खंब्याची मागणी करणाऱ्या पालघर जिल्ह्यातील वाडा येथील दोन वनपालांना दारूच्या खंब्याची लाच स्वीकारताना मंगळवारी दुपारी अँटी करप्शन ब्युरो पालघर युनिट पोलीस उपअधीक्षक नवनाथ जगताप यांच्या टीमने सापळा रचून रंगेहात अटक करून या दोघांवर गुन्हे दाखल केले आहेत.

तक्रारदार (33)वर्षीय पुरुष हे वाडा येथील एका बांधकाम व्यवसायिकाकडे मॅनेजर पदावर कार्यरत आहेत. त्यांची शेतीची जमीन बिनशेती म्हणजे एन.ए करण्याकरिता नाहरकत दाखला मिळावा असा त्यांनी अर्ज वन विभागाकडे केला आहे. हा वन विभागाचा ना हरकत दाखला देण्याकरिता विजय लक्ष्मण धुरी वय वर्ष (53) वनपाल नेहरोली परिमंडळ तालुका वाडा जिल्हा पालघर व विष्णू पोपट सांगळे वय वर्ष (55) वनपाल बाणगंगा परिमंडळ तालुका वाडा जिल्हा पालघर यांनी तक्रारदार यांच्याकडे दहा हजार रुपये आणि रॉयल स्टॅग दारूचा एक खंबा अशी लाचेची मागणी केली यावरून तक्रारदार मॅनेजर यांनी या वनपालांची लेखी तक्रार अँटी करप्शन ब्युरो पालघर कार्यालय यांच्याकडे केल्यावर

या तक्रारीची पडताळणी करून श्री. सुनील लोखंडे पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंध विभाग ठाणे परिक्षेत्र व श्री अनिल घेरडीकर अप्पर पोलीस अधीक्षक ठाणे परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली अँटी करप्शन ब्युरो पालघर विभाग पोलीस उपअधीक्षक नवनाथ जगताप,पोलीस हवालदार अमित चव्हाण, विलास भोये, निशा मांजरेकर ,नवनाथ भगत,दीपक सुमडा महिला पोलीस नाईक स्वाती तारवी या टीमने मंगळवार दिनांक 21 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी तीन वाजता सापळा रचून वनपाल विजय धुरी आणि विष्णू सांगळे या दोघांना तक्रारदार (मॅनेजर) यांच्याकडून रॉयल स्टॅग दारूच्या खांब्याची लाच स्वीकारताना रंगेहात अटक करून या दोघांवर वाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button