पालघर जिल्ह्यातील अपहरण झालेल्या अशोक धोडी यांचा कुजलेला मृतदेह सापडला गुजरात येथील एका बंद पडलेल्या दगडी खदानी मध्ये

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640
12 दिवसापासून बेपत्ता असलेल्या पालघर जिल्ह्यातील तलासरी वेवजी येथील शिवसेना शिंदे गटातील सामाजिक कार्यकर्ते आणि तलासरी येथील अवैध धंद्याची तक्रार करणारे अशोक धोडी यांचा मृतदेह 31 जानेवारी 2025 रोजी गुजरात येथे एका बंद पडलेल्या पाण्याने भरलेल्या 50 फूट खोल खदानित कुजलेल्या अवस्थेत त्यांच्याच ब्रेजा गाडीचा डीकित सापडला आहे.
अशोक धोडी हे 20 जानेवारी 2025 रोजी आपल्या ब्रेजा गाडीने मुंबई मिरा रोड येथे कामानिमित्त गेले होते. येथून घरी परत येत असताना त्यांनी आपल्या पत्नीला फोन करून मी जेवायला येतो असे सांगितले आणि ते घरी परतले नव्हते म्हणून त्यांच्या कुटुंबीयांनी घोलवड पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार दाखल केली होती.
गेल्या 12 दिवसांपासून ते घरी परतले नव्हते म्हणून त्यांचे भाऊ अविनाश धोडी यांच्या विरुद्ध त्यांच्या कुटुंबीयांनी संशय व्यक्त केल्यावर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यावर अविनाश धोडी फरार झाले आहेत .
त्यानंतर पोलिसांनी मनोज राजपूत राहणार गुजरात आणि सुनील धोडी जामशेत डहाणू यांना देखील ताब्यात घेतले होते. यांच्याकडून सखोल चौकशी आणि खाकी वर्दीचा धाक दाखवल्यावर त्यांच्याकडे मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी सखोल तपास केल्यावर मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने सीसीटीव्ही कॅमेरांद्वारे शोध घेतला असता अशोक धोडी यांची गाडी सुसाट वेगाने गुजरात कडे जाताना दिसून आल्यावर पालघर पोलिसांच्या पथकाने अशोक धोडी यांचा गुजरात येथे कसून शोध घेतला असता त्यांच्याच ब्रेजा गाडीच्या डीकित मागच्या बाजूला त्यांचा कुजलेला मृतदेह गुजरात येथील एका बंद पडलेल्या दगडी खदानीमध्ये 50 फूट खोल पाण्यातून बाहेर काढला आहे.
याबाबत या गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्या आरोपींचा पोलीस कसून शोध घेत आहेत. यातील मुख्य आरोपी भाऊ अविनाश धोडी असण्याची दाट शक्यता पोलिसांनी वर्तवली असून त्याच्या विरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत.त्याचा पोलीस कसून शोध घेत आहेत.