भारत सरकारच्या सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस (नोटरी) ने साताऱ्याचे ॲड जैद बागवान यांचा सन्मान…

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
रयत शिक्षण संस्थेच्या इस्माईल साहेब मुल्ला लॉ कॉलेजच्या माध्यमातून वकीली परीक्षेत डिग्री मिळवत साताऱ्याचे नामवंत वकील ॲड मिलिंद ओक यांचे कड़े प्रैक्टिस करत असलेले ॲड जैद बागवान यांच्या खांद्यावर भारत सरकार तर्फे होणाऱ्या नोटरी ची आणखी एक जबाबदारी पडली…
ॲड जैद बागवान हे सबंध महाराष्ट्रात तब्लिग जमातच्या कामाचे कक्षा रुंदावणाऱ्या मौलाना युनूस साब यांचे अत्यंत निकटचे सहकारी राहिलेले साताऱ्याचे मरहूम सिकंदरभाई (बावा) यांचे पूतणे असुन सातारा मार्केट यार्डातील प्रसिद्ध व्यापारी अकबरअली हाजी अ रहिमान बागवान यांचे चिरंजीव आहेत…

भारत सरकारच्या नोटरी चा सन्मान ॲड जैद बागवान यांना मिळाल्याने सर्वच समाज घटकातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असुन या मध्ये सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ हे आजोळी शहर मागे नसुन येथील मरहुम हाजी रहीमबक्ष यांचे नातू असणारे ॲड जैद बागवान हे महाराष्ट्र बागबान वर्किंग कमिटी चे हाजी मुश्ताकभाई बागवान यांचे जावई आहेत…
या वेळी महाराष्ट्र बागबान वर्किंग कमिटी चे प्रमुख डॉ शरीफ बागवान,सोलापूरचे हाजी फिरोजभाई तुळजापुरे,सत्तारभाई पांगरी वाले,वैराग चे साहिरभाई यांच्या सह टाइम्स 9 न्यूज चे पत्रकार आमीर मोहोळकर यांनी देखील ॲड जैद बागवान यांना शुभेच्छा देत आनंद साजरा केला…