पालघर उमरोळी येथील मी माहेर वाशीण उमरोळीची या सोहळ्यामध्ये उपस्थित महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन करताना सहाय्यक पोलीस निरीक्षक विजया गोस्वामी

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक : 7030516640
स्त्री म्हटलं की माहेरवास या माहेरवासाच्या झेडप्लस (z+) सुरक्षितेच्या छत्र छायेखाली जन्मदात्या आई-वडिलांन सोबत मुलींनी अनुभवलेला सुखद अनुभव म्हणजेच माहेरवास या माहेरवासातील हक्कांच्या व लहानपणातील आठवणींना उजाळा देण्यासाठी पालघर जिल्ह्यातील उमरोळी ग्रामपंचायतीच्या वतीने शुक्रवार दिनांक 31 जानेवारी 2025 रोजी ग्रामपंचायत उमरोळी क्रिकेट मैदानावर मी माहेरवाशीण उमरोळीची या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून केळवा सागरी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक विजया गोस्वामी आणि सौ. मनसी दलाल अध्यक्ष मनरे फाउंडेशन मुंबई या उपस्थित होत्या.
या कार्यक्रमात उपस्थित महिलांना पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या कार्यालयाकडून प्राप्त सायबर गुन्हे जनजागृती बाबतचे व्हिडिओ दाखवण्यात आले तसेच महिला अत्याचार,सायबर क्राईम,लैंगिक अत्याचार,रस्ते सुरक्षा व वाहतूक जागरूकता, महिला व बालकांची सुरक्षिता, डायल 112 व मूलभूत कायदे तसेच विशेष करून बालविवाह मुक्त भारत विषयांवर केळवा सागरी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक विजया गोस्वामी यांनी माहिती देऊन मार्गदर्शन केले.

यावेळी या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य श्रीमती वैदही वाढाण, माहीम सरपंच प्रीती पाटील , पंचाली सरपंच सुजाता पाटील,भावना विचारे व उमरोळी,माहीम ग्रामपंचायत पदाधिकारी सदस्य व विशेष करून महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती .