बापरे….ग्रामीण भागात रात्री नव्हे तर दिवसा घडते बिबट्याचे दर्शन. शेतात काम करणे झाले कठीण

सांगली जिल्हा प्रतिनिधी : आनंद सावंत, टाईम्स 9मराठी न्यूज, मो.8007 93 2121
सांगली : ग्रामीण भागात रात्रीचे नव्हे तर दिवसाही शेतामध्ये जाणे झाले कठीण,
रात्री शेतामध्ये गेल्यानंतर बिबट्याचे दर्शन घडायचे पण चक्क आता दिवसाही बिबट्या दिसू लागला आहे,
या वरून एका शेतकऱ्यांचे मनोगत,
मा. मुख्यमंत्री साहेब,
मी खेडेगावातील रहीवासी असुन शेती व्यवसाय करतो साहेब,
विद्युत मंडाळा कडुन रात्री 01:00 ते सकाळी 9:00 पर्यंत लाईट दिली जाते.
दिवसभर शेतात काम करून रात्री पाणी भरण्यासाठी रात्रभर शेतात ऊभे रहावे लागते सध्या थंडीचा महीना असुन ८ते १० डिग्री तापमान असते.
शेतकऱ्या बदल सरकारला एवढी चीड का आहे?
आम्ही रात्रभर का जागं राहायचं?
ज्या कोणी हा निर्णय घेतला असेन तो आम्हाला वैरी समजत असावा आणि रात्री शेतीला विज देता रात्री वीज डी.पी वरील फ्यूज गेला तर तो टाकण्यासाठी मंडळाने रात्रीचे कर्मचारी दिलेले नसतात.
आम्हा शेतकर्यांना जिव धोक्यात घालून फ्युज टाकावे लागतात.
येवढं करून आमच्या हातात काय पडतय?????
आम्हाला वाटलं ५७ वर्ष वाटोळं झालं आता नवं सरकार आलं चांगले दिवस येतील पण घरातील मोठे माणसे सांगत होते काहीच फरक पडणार नाही,तरी आमची कोणाकडूनही अपेक्षा राहीली नाही पण जमते का बघा…..
आहो साहेब रात्री घरातुन बाहेर निघालो तर आई म्हणते भाऊ बुट घातले का?
बायको टॉर्च देते, वडील म्हणतात काठी घेतली का?
मी येतो तुझ्या बरोबर…. रात्री साप, विंचु , बिबट्या सारखे संकटे असतात,
मी शेतात अंधारात असतांना त्यांना झोप लागत असेल काहाे???
मी तुमच्या कडे फार मोठी मागनी करत नाही सहज शक्य आहे फक्त शेतीला दिवसा किमान 8 तास लाईट द्यावी ही विनंती??

प्रत्येक शेतकर्यांकडून मुख्यमंत्री साहेब आपणास , वनविभागास आणि महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रिक बोर्ड पर्यंत पोहोचेल व आम्हा शेतकरी बांधवांना न्याय मिळेल………???
आपला एक
आशावादी शेतकरी.



