संपादकीय

गरीब मराठा युवकाचे भवितव्य काय?

ऍड अविनाश टी काले , अकलूज , तालुका माळशिरस , जिल्हा सोलापूर
मो न 9960178213

महाराष्ट्रातील मराठा वर्ग हा क्षत्रिय की कुणबी ?यावर बराच खल अलीकडील काळात झाला असला तरी हे मात्र 100%खरे आहे की , अगदी 350वर्षा पूर्वी ही तो शेतकरी होता व गरजे नुसार त्यातील कांहीं लढवय्ये लोक युद्ध मोहिमेच्या वेळी हातात शस्त्र धरीत ,
राजे , जहागीरदार , गढी प्रमुख सोडले तर बहुतेक वर्ग हा शेती करणारा वर्ग इतिहासात ही होता व आज ही मराठा समाज हा शेती क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर आहे
कृषी प्रधान असलेला हा समाज तत्कालीन काळातील ग्रामीण व्यवस्था नुसार सधन होता , ग्रामीण भागातील सुबत्ता म्हणजे शेतीतून पिकणारे धान्य , भाजीपाला , वैरण आणि त्यावर गुजराण करून दूध दुभते देणाऱ्या गाई म्हशी, बैल बारदना, हीच संपत्ती ,,,, याच आधारे त्यांनी निसर्गातील साधन सामुग्री वापरून वाडे बांधले , सुतार , गवंडी , कारागीर यांना वेतन म्हणून धान्य आणि तत्सम वस्तू दिल्या पैसा नावाची विनिमय व्यवस्था निर्माण झाली , त्याच क्षणी ग्रामीण कृषि आधारित अर्थव्यवस्था खिळखिळी किंवा क्षीण झाली ,

परंतु तिचा वेग अधिक वाढला तो भांडवली अर्थ व्यवस्थेच्या उदयाने ,,,भौतिक गरजांना बाजूला सारून कृत्रिम गरजात वाढ झाली , चकचकीत फर्निचर , डायनिंग टेबल , रंगीत कपडे , टिव्ही , कार गाड्या आणि सिमेंट ची सुबक आकर्षक दिसणारी जंगले उभी राहू लागली विहीर मोट जाऊन , धरणे , आणि कॅनॉल चे पाण्यातून शेती बागायती झाल्या , बैलाची जागा ट्रॅक्टर आणि शेण खताची जागा रासायनिक खतानी घेतली , हरित क्रांतीच्या याच पर्वात शेतीला जोड धंदे , व ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून सहकार निर्माण झाला ,
गावाचे पाटील असणारे , लोकशाही प्रक्रियेत पक्ष नेते झाले तेच सहकाराचे प्रवर्तक झाले , ही त्यांच्यात आमूलाग्र बदल घडवून गेली ,

ते सहकाराचे मालक झाले राज्य सरकारे त्यांच्या इशाऱ्यावर चालू लागली , पोलीस आणि प्रशासन त्यांच्या दिमतीला उभे राहिले , या शक्ती ने सर्व सामान्य मराठा त्यांच्या भक्तीत उतरला ,ते लोक कांहीं मंगळावरून आलेले नव्हते , ते त्यांच्या रक्ताचे होते , कुठे ना कुठे पदर लागत होता , नाही लागला तरी जात अस्मिते नुसार ते त्यांचे होते ,त्यांचा अभिमान आणि गर्व वाटणे ही नैसर्गिक भावना आहे ,पण या सर्व साठ मारीत सामान्य शेतकरी मराठा समाजाचे काय झाले?वारसा हक्काने जमिनीचे विभाजन होत गेले , भारतातील विविध कायद्याने जमिनीचे धारण क्षमतेला मर्यादित केले ,नैसर्गिक शेतीचा ऱ्हास झाल्याने व संकरित पिकांचा उदय झाल्याने त्यांना पोसणे म्हणजे तारेवरची कसरत ,,, त्यामुळे पेस्टी साईड वापरात आली , सेंद्रिय खत गेल्याने जमिनी कठीण झाल्या , बैलाने उलटा पालट होणारी शेती 50हॉर्स पॉवर ने करावी लागू लागली , त्यामुळे मशागती चां खर्च वाढला ,

बाजारात अधिक उत्पादन आले , पण दर घसरले , “खर्च आधारित दर ” हे धोरण कधी कोणत्याच शासन व्यवस्थेने स्वीकारलेच नाही , नौकरी म्हणजे दुसऱ्याची “हमाली” आपण आपल्या जीवाचे मालक , आमचा इतिहास हा राजे , महाराज असलेल्या अभिमानाचा ,,,,पण त्याच हमाला ना व्यवस्थेने शाश्वत उत्पन्नाची हमी दिली , ते शेतीत राबत नव्हते , उन्हात तळत नव्हते , चिखलाने भरलेल्या हातावर भाकरी घेऊन ते वांग्याचं भरीत खात नव्हते जे शेतकऱ्यांना कधीच मिळालं नाही ते सर्व सुख हा वर्ग भोगत होता जे राज्यकर्ते होते व आहेत तेही सर्व आपलेच आहेत ,आपले जातवाले आहेत , पण त्यांनी हे कायदे कधीच बनवले नाहीत ,वरून जे जे आले त्याची अंमलबजावणी त्यांनी केली , त्यांनी स्थापित केलेल्या सहकारी उद्योग जगता साठी कच्चा माल पुरवठा करणारा बहुतांश वर्ग हा मराठा च होता

त्यांनी निर्माण केलेल्या साखर कारखानदारी साठी असलेला ऊस , दूध संस्था साठी असलेले दूध , त्यांच्या सुत गिरण्या साठी असलेला कापूस सार कांहीं याच वर्गाने दिले , आणि लोकशाहीतील राजे बनवण्यासाठी ही त्यांना मतदान करणारा वर्ग ही जात म्हणून त्यांच्या पाठीशी राहिला ,,,गौरवशाली इतिहासाने त्यांचे उर भरलेले , तर आपलीच माणसे राज्यकर्ती म्हणून हे राज्य आमचे या भावनेने त्यांनी व्यवस्थेकडे पाहिले ती व्यवस्था त्यांना माणूस म्हणून सन्मानाचे जगणे जगू देण्यास तोकडी पडली , सार्वत्रिक हाल त्यांच्या वाट्याला आले , दुष्काळ , नैसर्गिक रोगराई , कमी भाव , कधी अवकाळी पाऊस , गारपीट , महापूर एक ना अनेक , त्यात ही त्याचे कष्टावर डल्ला मारणारे , रिकव्हरी चोरी पासून ते वजन काट्यात हेराफेरी करणारे कारखाने , शेतीतील ट्रॅक्टर ऊस वाहतुकी साठी त्याने कारखान्यास लावले करार केले ,

त्यातून रकमा उचलल्या , त्या ऊस तोड टोळ्यांना वितरित केल्या , त्यातील ही कांहीं बेईमान झाले , कांहीं नी रकमा बुडवल्या , कांहीं नी कमी क्षमतेने काम केले , कारखान्याचा बोजा अंगावर ठेऊन तो पळत राहिला त्याच्या सरदारकी ची वस्त्रे लक्तरात परावर्तीत झाली जो भूमी हिन होता , बेरोजगार होता तो सफाई आणि गावातील मजुरी सोडून सर्व प्रकारची कामे करण्यास तयार झाला, तो इस्टेट एजंट झाला , तो स्थानिक पुढारी झाला , पण शाश्वत उत्पन्न मिळण्याची कोणतीच हमी त्याला मिळाली नाही ,आज त्याची नवी पिढी समोर आली आहे , लाखो रुपये डोनेशन घेतल्या शिवाय शाळा एडमिशन देत नाहीत , तो ही फी कशी गोळा करतो त्याचे त्याला माहीत !

आमच्या तालुक्यातील कोंडबावी म्हणून गाव आहे , 10वित गेलेला एकुलता एक मुलगा , कलर टीव्ही आणा म्हणून हट्ट केला , बाप पैश्याची जुळणी करत होता , पण ती झाली नाही आणि पोरांन झाडाला फाशी घेतली ,,
मराठ वाड्यात हुंडा देऊन लग्न करण्याची परिस्थिती बापाची नाही , बापाची ओढाताण पाहून तीन मुली पैकी एकीने आत्महत्या केली , तेवढच मी माझ्या बापा चे डोक्यावरील ओझे कमी करीन अस म्हणाली ती तिच्या चिठ्ठीत ,,,एस टी पास ला पैसे नाहीत ,,, कस करावं शिक्षण म्हणून ही मुली ने फाशी घेतली ,,,,यावर उत्तर काय?आरक्षण ? ते मिळेल का?या प्रश्नाच्या उत्तरात पडणे फिजुल आहे ,,,त्या ऐवजी , ज्यांना आमचे माय बाप समजले , स्वातंत्र्य पूर्व काळा पासून ज्यांना आम्ही आमचं मानलं , त्यांच्या शिक्षण संस्था आहेत , अनेक उद्योग आहेत , त्यात “गरीब मराठा “समाजासाठी त्यांनी दत्तक योजना आणावी ,,,

त्यांच्या शालेय शिक्षणाचा खर्च उचलावा , स्पर्धा परीक्षेला बसण्याची पूर्व तयारी करणे साठी त्यांनी सेंटर काढून तिथे पुस्तके , व प्रशिक्षक नेमावेत , व मराठा युवकांना /युवतींना मोफत प्रशिक्षण द्यावे ही कल्पना मला कशी सुचली?आमच्या तालुक्यात डॉ कुमार लोंढे यांची सदाशिव देठे नावाची प्रशाला व ज्युनियर विद्यालय आहे , ते विना अनुदानित आहे डॉ कुमार लोंढे हे साखर कारखानदार नाहीत , फार मोठे आर्थिक उद्योजक नाहीत , त्यांचे कडे राजकीय शक्ती नाही , पण त्यांचे ह्रुदयात एक माणूस आहे , “माणुसकी “आहे जात धर्म , असा भेदभाव न करता जे गरीब व निराधार आहेत त्यांना त्यांनी शैक्षणिक दृष्ट्या दत्तक घेतले आहे जर हे डॉ कुमार लोंढे करू शकतात ,

स्वातंत्र्य पूर्व काळात छत्रपती शाहू राजे यांनी हॉस्टेल काढली , आणि मराठा मुलांना , जैन समाजाला , व मागासवर्गीय मुलांना शिक्षण देऊ केले तर ही बाब आज शेकडो चे घरात असलेले मराठा नेते सहज करू शकतात अस मला वाटतं ही बाब मी राजकीय हेतूने बोलत नाही , समाज म्हणून त्यांना खरोखर कळकळ असेल तर त्यांनी हे करावं ,फुकाच्या सहानुभूती समाजाला तारू शकणार नाहीत , तुम्ही आमचे आहात म्हणून हक्क सांगता , सामाजिक , राजकीय पाठबळाची अपेक्षा समाजाकडून ठेवता , त्या समाजाप्रती योगदान देणे तुमचे कर्तव्य आहे हे आत्ता कुणी तरी सांगणे आवश्यक आहे

मी मराठा समाजाचा प्रतिनिधी नाही , पण या समाजाच्या अश्रू शी माझे नाते आहे म्हणून हा प्रपंच,,,,,
जय जिजाऊ ,,, जय शिवराय ,,, जय भीम,,,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button