शहर

महेश बजरंग कोळेकर यांना 2023 चा म.मराठी चा राज्यस्तरीय उत्कृष्ट कार्य पुरस्कार जाहीर

उपसंपादक ——–हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448

महेश बजरंग कोळेकर यांना 2023 चा म मराठी चा राज्यस्तरीय उत्कृष्ट कार्य पुरस्कार जाहीर झाला आहे. कला, क्रीडा, राजकीय, सांस्कृतिक सामाजिक इत्यादी क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल हा पुरस्कार दिला जातो. लेखक महेश बजरंग कोळेकर यांनी केलेल्या विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेत म मराठी ने जो त्यांना पुरस्कार जाहिर केलेला आहे त्याचे कौतुक संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातील कला,क्रीडा,सांस्कृतिक,सामाजिक क्षेत्रातील नामवंत व्यक्तींनी केले आहे.

कोविड-19 काळात केलेले कार्य तसेच युवा महोत्सव मध्ये केलेले कार्य तसेच डिजिटल इंडिया या अभियान मध्ये केलेले कार्य, हर घर तिरंगा अभियान मध्ये केलेले कार्य, मतदान आधार जोडणी मध्ये केलेले कार्य, वृक्षारोपण, रक्तदान शिबीर, अनेक पथनाट्याच्या माध्यमातून अनेक सामाजिक विषयावर टाकलेला त्यांनी प्रकाश या सर्व कार्यांच्या निकषावर त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आल्याने त्यांच्या वर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क च्या वतीने आपले “हर्दिक अभिनंदन “.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button