महाराष्ट्र

मुंबई मध्ये शिवाजीपार्क वरील भाषणात राज ठाकरे यांच्या भाषणात महाराष्ट्र हित कुठे दिसलें

बी टी शिवशरणं

आज मुंबई मध्ये शिवाजी पार्क वर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढी पाडवा मेळावा झाला मेळाव्याला प्रचंड गर्दी झालेली पहायला मिळाली मेळाव्याचे भव्य आयोजन करण्यात आले होते मनसेप्रमुख राज ठाकरे हे आज काय बोलणार महाराष्ट्र हिताचे कोणते निर्णय जाहिर करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते मात्र नेहमी प्रमाणे तीच भाषा तेच आरोप निंदा नालास्ती लावरे तो व्हिडीओ मला काय देणार मीं कोणाला सूतसारखे सरळ करणार ही धमकी इशारे व पोकळ वलग्ना करणारे भाषण या पलीकडे राज ठाकरे यांनी नववीचार तो काय दिला मुंबई मधील माहीमच्या खाडीत अनधिकृत दर्गा बांधला जातोय याची त्यांनी क्लिप दाखवली

त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मुंबई पोलीस आयुक्त मुंबई महानगरपालिका आयुक्त यांना त्यांनी ते अनधिकृत दर्गा बांधकाम पडण्याचा इशारा दिला जर ते पाडणार नसतील तर तेथे भव्य गणपती मंदिर उभारले जाईल असा इशारा त्यांनी दिला त्यांचा तो इशारा बालिश व पोरकट पणाचे लक्षण आहे दर्गा बांधकाम सुरु असल्याची त्यांना जर माहिती कल्पना होती तर त्याचवेळी त्यांनी वर नमूद केलेल्या मान्यवराना का कळवले नाही तसेच एखाद्याने चूक केली म्हणून मग मीही मोठी चूक करतो अशी त्यांची भाषा आहे राज ठाकरे यांचा सामाजिक राजकीय पिंड ज्या शिव सेनेत झाला ती शिवसेना सोडून जावे लागले ती शिव सेना त्यांना वाचवता आली नाही

जे चुकले त्यांना ते एकत्रित ठेऊ शकले नाहीत ते राज ठाकरे अन्य पक्ष नेते यांच्यावर तोंड सुख घेतात म्हणजे हे अती झाले आपले ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे बघायचे वाकून आपले बुड स्थिर राखण्या साठी नवीन फ़ंडा म्हणून हिंदुत्व महाराष्ट्र हित ब्लु प्रिंट फक्त बोलण्या पुरते भाषणापुरते या पलीकडे काय
आता पर्यंत फक्त मेळाव्यात भाषणबाजी इशारे धमकी देण्यापलीकडे त्यानी महाराष्ट्रासाठी काय योगदान आहे हे महाराष्ट्र ओळखून आहे त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार त्यांची पुस्तके ग्रंथ त्यांची महाराष्ट्राबद्दल भूमिका यांचा जर मनापासून राज यांनी अभ्यास करुन चिंतन मनन आत्मपरीक्षण केले तर ते नक्की महाराष्ट्रात पुरोगामी विचारवंत नेते म्हणून मान्यता पावतील

सतत इतरांची नक्कल टिंगल टवाळी आरोप प्रत्यरोप करुन सर्वधर्म समभाव विसरून एका जातीपुरते व एका धर्मा पुरते मर्यादित संकुचित बोलून कोणी मोठे होत नसते खरे तर राज ठाकरे हे त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचाराशी प्रतारणा करुन आजोबांचे नावाला ते गालबोट लावून त्यांचा वारसा धुळीला मिळवत आहेत अश्याने ते महाराष्ट्र कसा जिंकू शकतील किंवा सत्तेत कसे येऊ शकतील हा महाराष्ट्र पुरोगामी विचारवंत प्रबोधनकार तसेच हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकर तसेच थोर संत महात्मे साधू महाराजांचा पराक्रमी विरांचा आहे बोलघेवढ्या निंदा नलस्ती करणारांचा नाही हे त्यांनी लक्षात असू द्यावे

त्यांच्या सभेला गर्दी करणारे मत पेटीत का दिसत नाहीत मनसे चा प्रचंड मेळावा जाहिर सभा नियोजन यांचा करोडो रुपये खर्च यासाठी कोण मदत करते कोण प्रायोजक असतो किंवा मनसेकडे एवढा पैसा येतो कुठून यांचा तपशील हिशोब त्यांनी महाराष्ट्राला द्यावा मनसेकडे अशी कोणती जादूची कांडी आहे ती फिरवली कीं मेळावा सभा रॅली जाहिरात बाजी वर करोडो रुपयांचा खर्च येतो कुठून अशावेळी किरीट सोमय्या नारायण राणे त्यांची मुले चित्रा वाघ मूग गिळून का गप्प असतात ईडी काय करते निवडणूक आयोग काय करतो याचे उत्तर महाराष्ट्र विचारणार आहे कीं नाही

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button