महाराष्ट्र
नरसिंहपूर परीसरातील गावांमध्ये गुढीपाडव्यानिमित्त कावडींची स्थापना

बावडा प्रतिनिधी मोहंमद कैफ तांबोळी, मोबाईल 8378076123
- शिखर शिंगणापूरच्या यात्रेचे मुख्य आकर्षण असलेल्या शंभू महादेवाच्या कावडींची इंदापूर तालुक्यातील गणेशवाडी, टणू, पिंपरी बुद्रुक, नरसिंहपूर येथे ‘हर हर महादेवच्या’ गजरात स्थापना करण्यात आल्या. गावोगावातील मंदिरात पाडवा वाचनानंतर कावडींची गावातून वाजत-गाजत शिव शंभो हरहर महादेवच्या गजरात भिमा नदीत अंघोळ घालून ग्रामप्रदक्षिणा घालण्यात आली.
यावेळी गावात ठिकठिकाणी महिलांनी कावडीचे पूजन केले. पिंपरी बुद्रुक येथील श्रीकांत बोडके, वर्धमान बोडके, बाळासाहेब घाडगे, बबन बोडके, सुनिल बोडके, कल्याण बोडके, ज्ञानेश्वर बोडके, समाधान बोडके, उदय बोडके, चक्रधर सूर्यवंशी, दादा कांबळे, अशोक बोडके, जिवन पाटील आदी उपस्थित होते. टणू येथील गौतम मोहिते यांच्या मानाच्या कवीचे पूजन सहायक पोलिस निरीक्षक नागनाथ पाटील यांनी केले. यावेळी संदीप मोहिते, गणेश साठे, महादेव मोहिते आदि मान्यवर उपस्थित होते.
पिंपरी बुद्रुक येथे कावडींची स्थापना झाल्यानंतर बाळासाहेब घाडगे, महादेव सुतार, उदय बोडके, महादेव देवशेटे यांच्या कडे परंपरेप्रमाणे कावडीतील भक्तांना शरबतचे वाटप करण्यात आले. तर माजी सरपंच आबासाहेब बोडके यांच्या कडे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
शिखर शिंगणापूर यात्रेला गुढीपाडव्यापासून सुरूवात होते. नवमी, दशमीला विदर्भ, मराठवाडा, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, कर्नाटक येथील भाविक दर्शनासाठी शिंगणापूरला येतात. दशमी, एकादशीला इंदूर, वाल्हेर घराण्यातील राजे राजा पुष्कर तलावात अंघोळ करून राजाचा वेश परिधान करून घोड्यावरून शंभू महादेवाच्या दर्शनासाठी येतात. पूजेच्या पहिल्या मानाप्रमाणे त्यांच्या हस्ते महापूजा व अभिषेक होतो. द्वादशीला पुणे जिल्ह्यातील मानाच्या कावडी कन्हा नदीचे पवित्र जल घेऊन मुंगी घाटातून अवघड चढण पार करीत शिंगणापूरमध्ये दाखल होतात. मुंगी घाट सोहळा पाहन्यासाठी हजारो भाविक गर्दी करतात. रात्री बारा वाजता कावडी महादेवाला जलाभिषेक करतात. नंतर कावडीच्या महाप्रसादानंतर यात्रेची सांगता होते.
फोटो – पिंपरी बुद्रुक येथे परंपरेप्रमाणे गुढीपाडव्याच्या दिवशी कावडीला भिमा नदीत अंघोळ घालून ग्रामप्रदक्षिणे द्वारे स्थापना करण्यात आली.




