शहर

श्रीपूर कामगार सोसायटी पंचवार्षिक निवडणुकीत जगदंबा पॅनेल हॅट्ट्रिक करणार कीं श्री यमाई देवी पॅनेल शिरकाव करणार
याकडे कामगारांचे लक्ष

बी.टी.शिवशरण


श्रीपूर येथील दि बृहन शुगर सिंडिकेट क्रेडिट एम्प्लॉईज सोसायटी या कामगार सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक येत्या पंचवीस मार्च रोजी मतदान होणार आहे ही संस्था माळशिरस तालुक्यात सतत ऑडिट वर्ग ए शेरा मिळवून दरवर्षी सभासदांना नऊ टक्के लाभांश देते पांडुरंग सहकारी साखर कारखाना शेती महामंडळ
ब्रिमा सागर महाराष्ट्र डिस्टलरीज श्रीपूर तसेच श्री चंद्रशेखर विद्यालय श्रीपूर या संस्थेचे सभासद आहेत

या सोसायटी ची स्थापना दिवंगत कामगार नेते वसंत पंढरीनाथ बोरकर यांनी केली आहे संस्थेचा चांगला नावलौकिक आहे ही संस्था कामगार सभासद यांच्या मदतीला तत्पर उपयोगी मदत करणारी म्हणून नावारूपाला आली आहे यापूर्वी काही अपवाद वगळता निवडणूक बिनविरोध झालेली आहे या संस्थेत दिवंगत ज्ञानेश्वर पवार सर विश्वभर वाघमारे गुलाब बनसोडे भालचंद्र शिंदे पाटील यांनी संचालक चेअरमन व्हा चेअरमन ही पद भूषवली आहेत

या वेळी संस्थेची निवडणूक लागली आहे जगदंबा कामगार विकास पॅनेल व श्री यमाई देवी कामगार सोसायटी परिवर्तन पॅनेल अशी लढत होतआहे यावेळी परिवर्तन करायचेच या भूमिकेतून संदीप खटके यांच्या नेतृत्वाखाली श्री यमाई देवी कामगार सोसायटी परिवर्तन पॅनेल ने विजय बापू पाटील यांचे नेतृत्वा खालील पॅनेल जगदंबा कामगार विकास पॅनेल लाआवाहन दिले आहे

दरवेळी तेच तेच संचालक तेच चेअरमन व्हा चेअरमन का असा मुद्दा नवीन पॅनेल ने उपस्थित करुन कोणत्याही परिस्थितीत जगदंबा पॅनेल ला या वेळी पुन्हा सोसायटी मध्ये निवडून द्यायचे नाही असा प्रचार सुरु केला आहे तर जगदंबा पॅनेल चे विजय पाटील व त्यांच्या सहकार्यानी सदर संस्था आम्ही उत्तम पद्धतीने चालवल्यामुळे आम्ही संस्थेला आतापर्यन्त सतत अडिट वर्ग ए मिळाला आहे संस्था कामगार सभासद यांच्या हिताचे दृष्टीने चालवली यात कुठेही शंका घ्यायला तासूभरही वाव अगर जागा नाही दूध का दूध पाणी का पाणी हे सभासद येत्या पंचवीस मार्च रोजी मतदानातून दाखवतील अशी अपेक्षा व्यक्त केली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button