महाराष्ट्र

वालचंदनगर पोलीस व सामाजिक कार्यकर्ते यांच्यातील प्रेक्षणीय क्रिकेट सामना आमदार दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थित संपन्न.

उपसंपादक – हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 67 448

रविवार दिनांक १९ मार्च २०२३ रोजी नऊदारे, ता.इंदापुर येथे दुपारी साडेतीन वाजता वालचंदनगर पोलीस स्टेशन व पंचक्रोशीतील सामाजिक कार्यकर्ते यांच्यात सामाजिक बांधिलकी, सामाजिक ऐक्य, सामाजिक सलोख्याचा संदेश देण्यासाठी प्रेक्षणीय क्रिकेट सामना संपन्न झाला. हा सामना वालचंदनगर पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे व ” आंबेडकरवादी” सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरज वनसाळे यांच्या कल्पनेतून झाला.

वालचंदनगर पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक अतुल खंदारे यांनी पोलिस बांधवांचे नेतृत्व केले तर मी आंबेडकरवादी सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरज वनसाळे यांनी सामाजिक कार्यकर्ते यांचे नेतृत्व केले. यावेळी पोलीस स्टेशनच्या संघामधुन पोलीस उपनिरीक्षक अतुल खंदारे, पोलीस उपनिरीक्षक मिलिंद मिठ्ठापल्ली, पोलीस कॉन्स्टेबल खाडे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल चितकोटे, पोलीस कॉन्स्टेबल शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल बेलदार व इतर पोलीस बांधव खेळले.

तर सामाजिक कार्यकर्ते यांच्या संघातुन मी आंबेडकरवादी सामाजिक संघटनेचे सुरज वनसाळे, सर्वस्वी सामाजिक कार्यकर्ते शेखर काटे, पिंटु उबाळे, पराग सुर्यंगंध, सुमित घोडके, अतुल बनसोडे, पोपट आठवले, सागर सावंत व इतर सामाजिक कार्यकर्ते खेळले. टॉस जिंकून वनसाळे यांनी प्रथम फलंदाजी घेतली. व चार ओहरमध्ये ३० रनांचे टार्गेट पोलीस बांधवांसमोर ठेवले. पोलीस उपनिरीक्षक खंदारे व बेलदार यांनी नाबाद सामना जिंकला.

विशेषतः या सामन्याचा आनंद इंदापूर तालुक्याचे विद्यमान आमदार व माजी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी लुटला. तसेच हा सामना झाल्यावर स्वतः भरणे यांना क्रिकेट खेळण्याचा मोह आवरला नाही.
तत्पूर्वी….

सुमित घोडके युवा मंच यांनी भरवलेल्या सरपंच चषकाचे बुधवार दिनांक १५ मार्च रोजी वालचंदनगर पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. व १९ मार्च रोजी सामन्यांची प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत सांगता झाली.सामने खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाले.तब्बल ३२ संघांनी सहभाग घेतला होता.या सामन्यांसाठी आयोजक अमित घोडके यांनी कठोर परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button