जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते नव उद्योजक महिला व महिला बचत गटांना कर्जाचे धनादेश वाटप

उपसंपादक ——–हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त व महिला दिनाचे औचित्य साधून महिला आर्थिक विकास महामंडळ, शिवरत्न वेल्फेअर ट्रस्ट व डॉटर मॉम्स फॉउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नव उद्योजक महिला व महिला बचत गटांना कर्ज धनादेश वितरणाचा कार्यक्रम महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला

याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे माजी. उपमुख्यमंत्री . विजयसिंह मोहिते पाटील .आमदार .रणजीतसिंह मोहिते पाटील,आमदार .राम सातपुते, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष.मदनसिंह मोहिते- पाटील, सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टीचे संघटन सरचिटणीस.धैर्यशील मोहिते- पाटील, पंचायत समिती माजी उपसभापती.अर्जुनसिंह मोहिते- पाटील ,.सत्यप्रभादेवी मोहिते-पाटील,माजी जिल्हा परिषद सदस्य.शितलदेवी मोहिते-पाटील, .वैष्णवीदेवी मोहिते-पाटील, माजी सरपंच .शिवतेजसिंह मोहिते-पाटील, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण).शिरीष सरदेशपांडे, जिल्हा परिषद प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी .संदीप कोहिनकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते,

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले,महिला बचत गटाच्या माध्यमातून सहकार चळवळीला गती येत असून आपण नगर जिल्ह्यात व मोहिते पाटलांनी सोलापूर जिल्ह्यात ही चळवळ गतीमान केली,या चळवळीला गती देण्यासाठी आपण आवश्यक सहकार्य करु, महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाच्या विक्रीसाठी सोलापूर येथे मॉलसाठी जागा व निधीही उपलब्ध करुन देवू, असे ते म्हणाले,पालकमंत्री विखे पाटील यांनी माजी सभापती .वैष्णवीदेवी व शितलदेवी मोहिते पाटील यांचे यावेळी कौतुक करून शिवरत्न वेल्फेअर ट्रस्ट व डॉटर मॉम्स फाउंडेशनने महिला बचत गटाने उत्पादीत केलेल्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली,

या समारंभास मा.बाबाराजे देशमुख,.अॅड.मिलिंद कुलकर्णी, .अॅड.प्रकाश पाटील, माजी सभापती शोभाताई साठे, उपसभापती .प्रताप पाटील,.सोमनाथ लामगुंडे,.रणजित शेंडे, .सोमनाथ भोसले यांच्यासह तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी व बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.



