शहर

माळशिरस तालुक्यात महाराष्ट्र औद्योगिक वसाहत काढून बेरोजगार तरुणांना काम मिळवून देण्याची गरज


बी.टी.शिवशरण


माळशिरस तालुक्यात बेकारी वाढल्याने हजारो तरुण नोकरीं धंदा नसल्याने निराश अवस्थेत आहेत आमदार रणजितसिंह मोहितेपाटील व आमदार राम सातपुते या दोघांनी माळशिरस तालुक्यात महाराष्ट्र औद्योगिक वसाहत आणून बेरोजगार तरुण तरुणीना नोकऱ्या धंदे उपलब्ध करुन देण्याची मागणी तालुक्यातून होत आहे दोन्ही आमदार सत्ताधारी पक्ष यांचे गटातील आहेत माळशिरस तालूक्यात लोकसंख्या वाढली आहे

बेरोजगारी चे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे सहकार महर्षी शंकरराव मोहितेपाटील यांनी माळशिरस तालुक्यात सत्तर वर्षांपूर्वी सहकार चळवळ राबऊन उद्योगं शेती पाणी शिक्षण पूरक व्यवसाय निर्माण केले त्यामुळे माळशिरस तालुका सुजलाम सुफलाम झाला मात्र सध्या लोकसंख्या बेकारी प्रचंड वाढली त्यामुळे बेरोजगार तरुणांना हाताला काम देण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक वसाहत मंडळ तालुक्यात आणणे गरजेचे आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button