पिंपरी बुद्रुकचे ग्रामदैवत पिरसाहेबांचा ऊरूस पन्नास वर्षांची एकोपा व भाईचाराची परंपरा जपत पार पडला. संदल,छबीना व कुस्त्यांचे ग्रामस्थांकडून योग्य नियोजन

बावडा प्रतिनिधी मोहंमद कैफ तांबोळी,
मोबाईल – 8378076123
पिंपरी बुद्रुक (ता. इंदापूर) येथील सर्वधर्मसमभावाचे प्रतीक ग्रामदैवत पीरसाहेब (उदगीरबाबा) यांचा उरुस ५० वर्षांची एकोपा व भाईचाराची परंपरा जपत पार पडला. तर राज्यातील नामवंत पैलवानांच्या हजेरीने कुस्तीचा फड रंगतदार झाला. पीरसाहेब उरुस कमिटी, ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या जय्यत तयारी व पोलीसांच्या चोख बंदोबस्तामुळे संदल, छबीना व तमाशाचा कार्यक्रम व ऊरूस शांततेत संपन्न झाला.

पिंपरी बुद्रुक पंचक्रोशीतील भाविकांचे ग्रामदैवत पीरसाहेब (उदगीरबाबा) यांचा ऊरूसानिमीत्त हलगी, लेझीम व ताशांच्या वाजनात संदल गावफेरीने मजारवर चढवण्यात आला. तर मुख्य ऊरूसानिमीत्त खाद्यपदार्थ, महिलांचे सौंदर्य प्रसाधने, खेळणी, विविध वस्तूंचे स्टॉल उभारण्यात आले होते. तर देवाच्या मानाच्या घोड्यांची मिरवणूक (छबीना) सायंकाळी नऊ वाजता फटाक्यांच्या आतषबाजीत तसेच लेझीम, हलगीच्या निनादात काढण्यात आला. त्यानंतर रात्री ९ वाजता पायल सावंत सोबत विशाल सावंत गोतोंडीकर यांचा लोकनाट्य तमाशा मंडळाचा तमाशाचा कार्यक्रम संपन्न झाला.
बुधवार दुपारी ४ वाजता कुस्त्यांचा जंगी मुकाबल्याचा आखाडा भरवण्यात आला. त्यामध्ये १०० रूपयांपासून ते ११ हजार रूपयांपर्यतच्या कुस्त्या खेळवण्यात आल्या. यामध्ये एक लाख ८० हजार रूपयांचे मानधन वाटप करण्यात आले. तसेच लखन राजमाने विरूद्ध चैतन्य बुधनवर, अविनाश गावडे विरूद्ध ओम माने, पप्पू शेख विरूद्ध दादा गोफणे, भैय्या चव्हाण विरूद्ध अभिजीत खटके अशा कुस्त्या खेळवण्यात आल्या. पंच म्हणून दत्तात्रय मगर, रणजीत वाघमोडे, बाळासाहेब बागाव, अमोल गायकवाड, दादा घोगरे, कमाल जमादार, अण्णा गायकवाड, मच्छिंद्र खटके, लक्ष्मण गावडे, आबा मगर, नवनाथ वाळेकर, सुनील बोडके, व्यंकट बोडके, तुकाराम मगर, चंद्रकांत सुतार, अशोक वाळेकर, दादा शेख यांनी काम पाहिले. कुस्त्यांचे समालोचन पै. हरिभाऊ खाडे, महेश सुतार यांनी केले.

कुस्त्यांचा फड संपल्यानंतर पिरसाहेबांच्या मानाच्या घोड्यांची सर्वधर्मियांच्या हस्ते विधीवत पूजा करून दर्गाह सभोवताली पाच फेऱ्या मारताना “पिरसाहेबकी दो चारो दिन्न, उदगिर साहेब की दो चारो दिन्न” असा दिन जागवण्यात ( घोषणा देण्यात ) आले. त्यानंतर पिरसाहेबांच्या मजारवर फुल चढवून फातेहा ( प्रार्थना ) करून उरुसाची यशस्वी सांगता करण्यात आली.
पिरसाहेब यांच्या ऊरूसाचे नियोजन सरपंच ज्योती बोडके, उपसरपंच पांडूदादा बोडके, अनंता बोडके, माजी सरपंच श्रीकांत बोडके, आबासाहेब बोडके, पोलीस पाटील वर्धमान बोडके, बबन बोडके, अशोक बोडके, रामचंद्र लावंड, सुनिल बोडके, संजय बोडके, नामदेव बोडके, निलेश बोडके, राजेंद्र मगर, सुदर्शन बोडके, सौदागर काटकर, बाळासाहेब घाडगे, समाधान बोडके, संतोष सुतार, कल्याण भंडलकर, हनुमंत सुतार आदिंसह ग्रामपंचायत, ग्रामस्थ व नागरीकांनी केले होते.

तसेच मौलाना तय्यब शेख, मौलाना दस्तगीर भाई, मुबारक शेख, सुल्तान शेख, ताजुद्दीन शेख, नबीलाल शेख, खुदबुद्दीन शेख, शाबुद्दीन शेख, अस्लम शेख आदि समाज बांधवांच्या वतीने फातेहा पठण, तोरण व नारळाचे योग्य नियोजन करण्यात आले.
चौकट – पीरसाहेब यात्रेनिमित्त मागील पन्नास वर्षापासूनची पोलीस संरक्षणाविना ऊरूस संपन्न होण्याची परंपरा आजही कायम आहे. कै. लोकनेते महादेवराव बोडके (दादा), पांडुरंग बोडके (नाना) यांनी घालून दिलेली शांतता व संयमाची शिकवण सर्वधर्मीय ग्रामस्थांनी तंतोतंत पाळल्याचे दिसून आले.




