करमाळा तालुक्याच्या अंगणवाडीच्या मदतनीसच्या एकूण 99 जागेसाठी भरती प्रक्रिया सुरू,बालविकास प्रकल्प अधिकारी आनंद जाधव यांची माहिती

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प करमाळा अंतर्गत सन 2024 करिता अंगणवाडी मदतनीस पदाची भरती प्रक्रिया येत्या दिनांक 24 जून 2024 पासून सुरू असल्याची माहिती बाल विकास प्रकल्प अधिकारी श्री आनंद जाधव यांनी एका प्रसिद्धी पत्रकार द्वारे दिली आहे

प्रसिद्धी पत्रकात पुढे असे म्हटले आहे की एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प अंतर्गत करमाळा तालुक्यात एकूण 99 मदतनीसाचे रिक्त पदे भरावयाची असून मदतनीस पदासाठी वय 18 ते 35 व विधवा करिता वय 18 ते 40 असून इच्छुक उमेदवारांनी दिनांक 24/06/2024 ते दिनांक 5/07/2024 अखेर कार्यालयीन वेळेत एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प तहसील कार्यालय आवार करमाळा येथे अर्ज स्वीकारण्यात येतील तेव्हा इच्छुक उमेदवारांनी संपूर्ण कागदपत्रासह अर्ज सादर करण्याचे आवाहन बालविकास प्रकल्प अधिकारी श्री आनंद जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या शेवटी केली आहे



