कुगाव जवळ वादळी वाऱ्याने उजनीतील प्रवासी बोट उलटली एक प्रवासी बचावला मात्र पाच ते सहा प्रवासी बेपत्ता अद्यापही रात्रीची शोध कार्य सुरू

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
करमाळा तालुक्यातील कुगाव व झरे येथून इंदापूर तालुक्यातील कळाशी येथे प्रवासी वाहतूक करणारी लॉन्च अर्थात बोट उजनी धरणाच्या पाण्यात पलटल्याची घटना आज तारीख 21 सायंकाळी पाच वाजता घडली आहे या घटनेने करमाळा तालुक्यातील झरे येथील एका कुटुंबातील चार सदस्यांचा समावेश असून उगाव येथील दोन तरुणांचा समावेश आहे सदरच्या सर्व व्यक्ती बेपत्ता असल्याची भीती व्यक्त केली जात असून याच बोटीतील एका ने पोहोत जाऊन आपला जीव कसाबसा वाचविला आहे इतर सहा जणांचा अद्यापही रात्रीपर्यंत शोध कार्य मोहीम तपास सुरू आहे
याबाबत मिळालेली माहिती अशी की आज तारीख 21 मे मंगळवार रोजी सायंकाळी करमाळा तालुक्यातील झरे येथील जाधव कुटुंबातील चार सदस्य तसेच कुगाव येथील दोन तरुण व एक पीएसआय उजणीतील बोटीने पाण्याच्या मार्गाने इंदापूर तालुक्यातील कळाशी येथील आपल्या पाहुण्यांच्या कार्यक्रमानिमित्त निघाले होते कुगाव ते कळाशी प्रवासी वाहतूक करणाऱ्या लॉन्चद्वारे पोलीस उपनिरीक्षक राहुल डोंगरे यांच्यासह झरे येथील जाधव कुटुंबातील दांपत्य व त्यांची दोन लहान मुले तसेच कुगाव येथील दोन पुरुष सदस्य यांचा हा प्रवास सुरू होता सदर लॉन्च बोट कळाशी हद्दीत आल्यानंतर अचानक सुटलेल्या वादळी वाऱ्याने हेलकावे खात सदरची बोट बुडाली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे सदरची बोट बुडाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक डोंगरे यांनी पोहत जाऊन काळाशी गाठून तेथे या अपघाताबाबत माहिती दिली आहे

या घटनेची माहिती मिळताच काळाशी तसेच कुगाव येथील ग्रामस्थांनी रात्री उशिरापर्यंत उलटलेली बोटातील मृतदेहाचा शोध सुरू केला असून अद्यापही त्यांचा शोध लागलेला नाही सदर घटनास्थळाला इंदापूर पोलीस तसेच करमाळा पोलीस याशिवाय बचाव पथकाने ही घटनास्थळी जाऊन घेतली असून शोध कार्य मोहीम युद्ध पातळीवर चालू आहे याबाबत पुढील तपास पोलीस यंत्रणा करीत आहे
हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज सायंकाळी पाच वाजता करमाळा शहर तसेच परिसरात वादळ सुटल्याने या वादळाचा तडाका सदर कुगाव ते कळाशी जाणाऱ्या वादळ बोटीला बसला या प्रवासी बोटीमध्ये एकूण सात प्रवासी होते ते कुगाव येथून काळाशी येथे चालले होते यामध्ये एकाने आपला कसाबसा जीव वाचविला त्यानंतर या बोटीतील पाच ते सहा प्रवासी उजनीच्या पाण्यात बुडाले यामध्ये एक तीन वर्षाची मुलगी तसेच एक वर्षाचा मुलगा असल्याचे समजते तपास करण्याचे मोहीम अद्यापही चालू असल्याचे कुगाव ग्रामस्थांचे तंटामुक्तीचे अध्यक्ष सय्यद युनूस यांनी बोलताना माहिती दिली



