मोहिते पाटील समर्थक अल्ताफ शेख यांच्या निवासस्थानी धैर्यशील भैय्या मोहिते पाटील यांची भेट

उपसंपादक—-हुसेन मुलाणी
टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
मो. 9730 867 448
विजयवाडी येथील मोहिते पाटील परिवाराचे समर्थक अल्ताफ शेख यांच्या निवासस्थानी भाजपा सोलापूर जिल्हा संघटन सरचिटणीस धैर्यशील (भैय्यासाहेब) मोहिते पाटील यांनी भेट दिली ,असुन
असे माझ्या सारखे हजारो कार्यकर्त्यांन वर प्रेम करणारे व प्रत्येक कार्यकर्त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होऊन कार्यकर्त्याला बळ व ताकद देण्याचे काम मोहिते पाटील परिवार करत असतो,

आज विजयवाडी येथील इंगळे परिवार यांच्या येथे घरगुती कार्यक्रमासाठी आले असताना आवर्जून धैर्यशील मोहिते पाटील अल्ताफ शेख यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबाचे विचार पूस करत एक आपलेपणा सिद्ध केला.
राज्यकर्त्यांचे अथवा नामांकित व्यक्तींच्या कुटुंबाला भेट देणारे भरपूर नेते आहेत. परंतु अल्पसंख्यांक समाजातील ज्यांना कोणती राजकीय पार्श्वभूमी नाही अशा सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या घरी येऊन आपल्या कार्यकर्त्याला बळ देणे हे फक्त मोहिते पाटीलच करू शकतात. आज त्यांच्या भेटीने विजयवाडी मध्ये एक चर्चा होती की कार्यकर्ते सांभाळावे फक्त मोहिते पाटील यांनीच
धनसंपती लुटली तरी कार्यकर्त्यांचे नातं टिकवणं अवघड असते सुख दुःखात सहभागी होऊन आपल्या कार्यकर्त्यांच्या ऋणानुबंधनाचे नाते जोपासण्याची किमया फक्त मोहिते पाटील परिवार निस्वार्थ पणे करतायत.. आज विजयवाडी करांनी पाहिले मोहिते पाटील यांचे कार्यकर्त्यावर असलेले प्रेम

यावेळी विजयवाडी चे सरपंच उमेश भंडारे,उपसरपंच प्रतिनिधी .शिवाजी बंडगर,उपसरपंच .शंकर वाघमोडे,पोलीस पाटील .अनिल लावंड,ग्रामपंचायत सदस्य रवींद्र इंगळे,शिवामृत दुध संघाचे संचालक .त्रिंबक इंगळे,.बाळासाहेब इंगळे,.दत्तात्रय इंगळे,आलम काझी, प्रकाश पवार .तात्याबाळा वाघमोडे,.हणुमंत पवार, राजु सकट,.श्रीकृष्ण(भैय्या) रेळेकर, शुभम इंगळे, सोहेल शेख,.अशोक शिंदे,.राजु शिंदे, .शरद पवार व शेख परिवारातील सदस्य उपस्थित होते.



