शहर

हरभऱ्याच्या घटलेल्या उताऱ्याचा व भावाचा झाला खेळ,पण शेतकऱ्यास उत्पन्न व खर्चाचा बसता बसेना मेळ- निखिल मोरतकर शेतकरी शिरफुली

प्रतिनिधी मायाताई सागर पाईकराव यवतमाळ

या वर्षी हिवाळ्यात हरभरा या पिकास हवी तशी थंडी न पडल्याने महागांव तालुक्यातील फुलसावगी, काळी, टेंभी,राहुर,शिरपुल्ली,रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकऱ्यांचे रब्बी हंगामातील महत्त्वाचे असलेल्या पीक म्हणजे हरभरा या पिकांची काढणी सुरू झाली असून वातावरणामुळे हरभरा पिकाचा उतारा मोठ्या प्रमाणात घटल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात व खर्चात तालमेळ बसता बसेनासा झाला आहे.या मुळे सर्व शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.मागिल काही वर्षांपासून तालुक्यातील शेतकरी हा निसर्गाच्या प्रकोपाने सततची नापिकीमुळे अस्मानी व सुलतानी संकटाने त्रस्त झाला आहे.

तालुक्यातील शेतकरी हा या वर्षी हवामान खात्याच्या अनुकूल अंदाजाने आनंदी होता.परंतु अतिवृष्टीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या शेतातील खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी देशोधडीला लागला.संपूर्ण दारोमदार हि रब्बी पिकावरच होती. मात्र या वर्षी कडाक्याची थंडी कधीच पडली नसल्याने त्या वातावरणाचा रब्बी पिकांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला असल्याचे चित्र सध्या सुरू असलेल्या हरभरा पिकाच्या उताऱ्यावरून दिसून येत आहे‌.आधीच उत्पन्न कमी आणि त्यातही भाव नसल्याने शेतकरी हतबल झाला असून आकडेमोड करत वर्षाचा कुटुंब कबिला चालविणे व कर्तव्ये असलेली मंगल कार्ये,पाल्यांचे शैक्षणिक खर्च व इतर गरजा कशा भागवाव्या या विवंचनेत सापडला आहे.खरीप हंगामात कापूस,सोयाबीन,मुग,उडीद,तुर व इतर पिकांची अतिवृष्टी पावसाने वाट लावल्याने शेतकऱ्यास उत्पन्न अत्य अल्प मिळाले आहे.

यावर्षी पाऊस भरपूर झाल्याने हिवाळा चांगला होईल अशी आशा मनी बाळगत काही प्रमाणात सिंचन सुविधा उपलब्ध असलेला शेतकरी रब्बी हंगामात याची कसर काढण्याचा निश्चिय करून रब्बी पिक घेण्याच्या तयारीत रममाण झाला. परंतु रब्बी हंगामानेही दगा दिल्याने,शेतकऱ्यांनी आखलेल्या आराखड्याचा संपूर्ण बदृयाबोळ झाला.

त्यातच कापूस,सोयाबीनला चांगला भाव मिळेल या आशेने घरातच दडवून ठेवला असतांना आता रब्बी मध्ये हरभऱ्याची पण तीचं अवस्था झाल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.वरुन बँकेच्या व खाजगी उधारीच्या वसुलीचा ससेमीरा मागें लागला असल्याने चिंतेत अधिकच भर पडली आहे. शासनाकडून तुटपुंजी मदत शेतकऱ्यांना देण्यात आली परंतु त्यांच्या उत्पादन व उत्पादन खर्चाचा मेळ बसत नसल्याने पुढील काळात नियोजन कसे करायचे हिच चर्चा तालुक्यातील शेतकऱ्यामध्ये होत आहे.

सध्या ग्रामीण भागामध्ये हरभऱ्याचा भाव ४३०० रुपये क्विंटल व्यापारी खरेदी करत आहेत. यावर्षी बदलत्या वातावरणामुळे हरभरा या पिकाला जास्त रोगराईने ग्रासल्याने हरभऱ्याच्या उत्पन्नामध्ये कमालीची घट झाली आहे. शेतकऱ्यांनी लावलेला खर्च सुद्धा यावर्षी निघाला नाही.

निखिल मोरतकर शिरपुल्ली शेतकरी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button