शहर

सुरत येथील हरवलेल्या (13) वर्षीय मुलीला पालघर रेल्वे पोलिसांनी केले तिच्या वडिलांच्या स्वाधीन

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640. पालघर जिल्हा वृत्तांत..

गुजरात राज्यातील सुरत अण्णासागर येथील हरवलेल्या (13) वर्षीय मुस्लिम मुलीला पालघर रेल्वे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश रणधीर आणि त्यांच्या सहकारी रेल्वे महिला पोलिसांनी सुखरूप पणे पालकांच्या ताब्यात दिले आहे. ही घटना सोमवारी पालघर रेल्वे स्थानकावर घडली आहे.

सोमवार दिनांक 13 मार्च 2023 रोजी रात्री 8 वाजता एक (13) वर्षीय मुलगी काळ्या रंगाच्या बुरख्यामध्ये पालघर रेल्वे फ्लॅट क्रमांक 1 वर घाबरलेल्या परिस्थितीत इकडून तिकडे फेऱ्या मारत होती ही बाब जेव्हा पालघर रेल्वे स्थानकात ड्युटीवर असलेल्या रेल्वे महिला पोलीस हवालदार रूपाली गायकवाड, महिला पोलीस हवालदार मोनिका भोईर, महिला पोलीस हवालदार दीप्ती गोळे, महिला पोलीस हवालदार बंडगर यांच्या निर्देशनास आल्यावर त्यांनी त्वरित या मुलीला ताब्यात घेऊन वरिष्ठांच्या आदेशानुसार तिला विश्वासात घेऊन तिची चौकशी केल्यावर

तिने आपले नाव आयशा मुस्ताक पठाण असे सांगून तिने दिलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर पालघर रेल्वे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश रणधीर यांनी संपर्क साधून तिच्या वडिलांना गुजरात राज्य सुरत अण्णासागर हॉटेल गल्ली नंबर 12 येथून त्वरित पालघर रेल्वे पोलीस कार्यालय येथे बोलवून ओळख पटवून देऊन त्यांचा जबाब नोंदवून या मुलीला मंगळवार दिनांक 14 मार्च 2023 रोजी सुखरूप पणे तिचे वडील मुस्ताक कासम पठाण वय वर्षे (40) यांच्या ताब्यात दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button