शहर

जुनी पेन्शन योजना करिता आंदोलनात उतरलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास दादा पाटील यांचा जाहीर पाठिंबा

उपसंपादक ——-हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448

महाराष्ट्र शासनाने नोव्हेंबर 2005 नंतर शासकीय सेवेत सेवा बजावत असलेल्या सर्व शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना दिले जाणारे (निवृत्तीवेतन) जुनी पेन्शन चालू करावी म्हणून या मागणीसाठी राज्यभरात शासनाच्या विरोधात दिनांक 14 मार्च 2023 पासून बेमुदत आंदोलन चालू असून सर्व शासकीय व निमशासकीय कर्मचारी या आंदोलनात उतरले असून आज आंदोलनाचा 2 रा. दिवस आहे तरीही झोपेचे सोंग घेतलेले सरकार अद्याप जागे झाले नाही

त्यामुळे शासकीय व निमशासकीय कर्मचारी व महाराष्ट्र राज्याच्या शिक्षक व शिक्षक शिक्षकेतर समितीच्या वतीने चालू असलेल्या आंदोलनास उस्मानाबादचे धडाडीचे व जनतेच्या गळ्यातील ताईच असलेले कर्तव्यदक्ष खासदार ओम राजे निंबाळकर व आमदार कैलास दादा पाटील या दोघांनी या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला असल्याचे पत्र दिले आहे

त्यामुळे या राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांचा विचार करणारा अथवा दक्षता घेणारा हक्काचा प्रतिनिधी आहे अशी भावना कर्मचाऱ्यांच्या मनात निर्माण झाली असून त्यांना लढण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास दादा पाटील यांची साथ मिळाल्याने नक्कीच कर्मचाऱ्यांना न्याय आणि दिलासा मिळेल अशी आशा पल्लवीत झाली आहे
तसेच या या कर्मचाऱ्यांना आमदार या नात्याने पाठिंबा देत असल्याचे पत्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button