पिराची कुरोली येथील हजरत गायकवाड साहेब यांच्या उरूस निमित्त ॲड. एम.जी.तांबोळी परिवाराच्यावतीने महाप्रसादाचे आयोजन

उपसंपादक ——–हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448
पिराची कुरोली ता. पंढरपूर येथील हजरत (गाय चराऊ) गायकवाड साहेब यांचा उरूस रविवार दिनांक 12 मार्च 2023 रोजी रंगपंचमीच्या दिनी संपन्न होणार असून या उरुसास हजारोंच्या संख्येने हिंदू मुस्लिम बांधव उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेत असतात

त्या अनुषंगाने अकलूज येथील विधिज्ञ ॲड.एम .जी .तांबोळी. परिवाराच्या वतीने रविवार दिनांक 12 मार्च 2023 रोजी दुपारी 11 वाजता (लंगरे आम) महाप्रसादाचे आयोजन केले असल्याचे आबेद हुसेन तांबोळी यांनी “टाइम्स 9 न्यूज मराठी” शी बोलताना सांगितले असून या महाप्रसादाचा लाभ सर्व भाविक भक्तांनी घ्यावा असेही आवाहन आबेद हुसेन तांबोळी यांनी केले आहे या महाप्रसादाच्या कार्यक्रमाकरिता वतन ग्रुप अकलूज, मुजावर जमात -पिराची कुरोली ,यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे

पिराची कुरोली येथे हजरत( गाय चराऊ) गायकवाड साहेब यांच्या सह हजरत बडे साहेब, हजरत मासाहेब, हजरत सय्यद बादशाह, हजरत जमालुद्दीन, हजरत कमालुद्दीन ,यांचा (चिल्लाह) समाधी असून येथे दरवर्षी हजाराच्या संख्येने भाविक उरुसास उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतात शिवाय उरुसा ला येणाऱ्या हजारो भाविकांसाठी पिराची कुरोली ग्रामस्थांच्या वतीने सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असतात.



