शहर

बोईसर येथे भर दिवसा सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या तीन दरोडेखोरांच्या आवळल्या स्थानिक गुन्हे शाखा पालघर यांनी मुसक्या

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640 पालघर जिल्हा वृत्तांत

बोईसर येथील भर दिवसा राजश्री ट्रान्सपोर्ट या खाजगी कार्यालयावर सशस्त्र दरोडा टाकून फरार झालेल्या तीन दरोडेखोरांच्या मुसक्या आवळून त्या दरोडेखोरांना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखा पालघर आणि बोईसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे यांना यश आले आहे.


शुक्रवार दिनांक 3 मार्च 2023 रोजी दुपारी 3 वाजता बोईसर राजश्री ट्रान्सपोर्ट या खाजगी कार्यालयात एक महिला व पुरुष काम करत असताना तीन अज्ञात व्यक्तीने या दोघांना बंदुकीचा व चाकूचा धाक दाखवून त्यांच्या अंगावरील सोन्याची चेन व मंगळसूत्र व हातातील अंगठी असा एवज लुटमार करून त्यांना दोरीने खुर्चीला बांधून फरार झाले होते.

या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.बाळासाहेब पाटील,अप्पर पोलीस अधीक्षक पंकज शिरसाट यांच्या आदेशान्वये श्री.नित्यानंद झा सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पालघर व बोईसर पोलीस ठाणे येथील अधिकारी व अंमलदार यांची वेगवेगळी पथके तयार करून तपासाबाबत या पथकांना सूचना देण्यात आल्या होत्या

यापैकी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक पुराव्यांच्या आधारे कोणतेही धागेदोरी नसताना सखोल व कौशल्यपूर्ण तपास करून मुंबई, कल्याण, घाटकोपर येथून या तीन दरोडेखोरांना शुक्रवार दिनांक 10 मार्च 2023 रोजी अटक करून त्यांच्या ताब्यातील एकूण 52 हजार रुपयांचा सोन्याचा मुद्देमाल जप्त करून या तीन दरोडेखोरांना जेरबंद केले आहे.


सदरची यशस्वी कामगिरी पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.बाळासाहेब पाटील,अप्पर पोलीस अधीक्षक श्री.पंकज शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदीप कसबे पोलीस निरीक्षक बोईसर पोलीस ठाणे व श्री.अनिल विभुते पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा पालघर, सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन पडळकर, पोलीस उपनिरीक्षक गणपत सुळे, पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल सावंत देसाई स्थानिक गुन्हे शाखा पालघर, पोलीस उपनिरीक्षक शरद सुरळकर,पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल मणिकेरी , पोलीस अंमलदार दीपक राऊत, नरेंद्र पाटील,राकेश पाटील, दिलीप जनाठे, संजय धांगडा, विजय ठाकूर,पोलीस नाईक कल्याण केनगर,प्रशांत निकम, वैभव जामदार या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button