शहर

उद्धवजी बाळासाहेब ठाकरे शिवसेना पालघर उपजिल्हा प्रमुख पदी श्री.अनुप पाटील यांची नियुक्ती

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक. 7030516640.पालघर जिल्हा वृत्तांत.


उद्धवजी बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या पालघर उपजिल्हाप्रमुख पदी सफाळे येथील श्री.अनुप पाटील यांची पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशान्वये आणि आदित्यजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे.
पालघर जिल्ह्यातील सफाळे कपाशे येथील श्री.अनुप पाटील हे शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक अशी त्यांची संपूर्ण पालघर जिल्ह्यात ओळख आहे.

1989 पासून म्हणजे ठाणे-पालघर माजी जिल्हाप्रमुख श्री.उदय बंधू पाटील यांच्यासोबत ते आतापर्यंत गेली 35 वर्षापासून शिवसेनेमध्ये कार्यरत आहेत.1989 मधील शिवसेनेचा कट्टर कार्यकर्ता त्यानंतर शिवसेना सफाळे विभाग प्रमुख, सफाळे विभागीय प्रमुख, पालघर उपतालुकाप्रमुख, पालघर जिल्हा समन्वयक अशा शिवसेना पक्षाने त्यांच्यावर सोपवलेल्या पक्ष हिताच्या जबाबदाऱ्या त्यांनी खंबीरपणे पक्षासोबत निष्ठावंत राहून पार पडल्या आहेत. यामुळे पालघर तालुक्यात शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी त्यांची महत्वाची भूमिका आहे.

यानंतर 2022 रोजी शिवसेना पक्षात बंडखोरी झाल्यानंतर पालघर जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेत्यांसह कार्यकर्त्यांनी पक्षात बंडखोरी केल्यामुळे पालघर तालुक्यातील 2022 रोजी पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये पालघर तालुक्यात सक्रिय राहून अनेक ग्रामपंचायतीवर उद्धवजी बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची मशाल फडकवण्यात त्यांना यश आले आहे .

त्यांच्या या सर्व कामाची दखल घेऊन 9 मार्च 2023 रोजी पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे व आदित्यजी ठाकरे यांनी श्री.अनुप पाटील यांची पालघर उपजिल्हाप्रमुख पदी नव्याने नियुक्ती केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button