डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माळेवाडी ( अकलुज) येथे खाऊवाटप
उपसंपादक——-हुसेन मुलाणी
टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
मो..9730 867 448
सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद चे कार्याध्यक्ष डाॕ.धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य सतीश साठे व मित्र मंडळ माळेवाडी अकलूज यांच्या वतीने जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा माळेवाडी अकलूज येथील सर्व विद्यार्थी तसेच अंगणवाडी येथील सर्व विद्यार्थी अशा एकूण ५०० विद्यार्थ्यांना बिस्कीट पुडे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस रणजितसिंह देशमुख ,शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सतिश साठे सावतामाळी प्रशाला समिती, सदस्य राजाराम कांबळे,APN न्यूज पत्रकार केशव लोखंडे,सामाजिक कार्यकर्ते आप्पा मोरे, रफिक सय्यद , अनिल इरकर ,अल्पसंख्यांक सेल चे अकलुज शहर अध्यक्ष जमीर पठाण ,मनसे अकलुज शहराध्यक्ष -सुदाम आवारे,तसेच सर्व शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक विजय अस्वरे यांनी तर दिलीप वाघमारे यांनी आभार मानले.