क्राईम

सफाळे माकणे पंडितपाडा गावात 45 लाख रुपयांचा ब्राऊन शुगर अंमली पदार्थ जप्त..पालघर पोलिसांची कारवाई

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :
7030516640

सफाळे माकणे पंडित पाडा गावातील एका बिल्डिंगच्या फ्लॅटमध्ये ब्राऊन शुगर अंमली पदार्थाचा साठा विकण्याच्या उद्देशाने साठवून ठेवणाऱ्या एका महिला पुरुषासह विधी संघर्षित बालकाला पालघर पोलिसांनी छापा टाकून त्यांच्या ताब्यातील 44 लाख 92 हजार 200 रुपयांचा ब्राऊन शुगर अंमली पदार्थांचा साठा रविवारी जप्त केला आहे.

सफाळे पश्चिम येथील माकणे पंडित पाडा गावातील साई सिद्धी बिल्डिंग रूम नंबर A/401 मध्ये ब्राऊन शुगर अंमली पदार्थाचा साठा विक्री करण्याच्या उद्देशाने साठवून ठेवल्याची गोपनीय माहिती पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक यतीश देशमुख आणि अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक विनायक नरले यांना प्राप्त झाल्यावर त्यांच्या मार्गदर्शनाखाली विकास नाईक उपविभागीय पोलीस अधिकारी पालघर, पोलीस निरीक्षक अनंत पऱ्हाड पालघर पोलीस ठाणे, पोलीस निरीक्षक सुनील जाधव बोईसर पोलीस ठाणे. सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता शेळके सफाळे पोलीस ठाणे, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत हाके, पोलीस उपनिरीक्षक दीप विजय भवर, सहाय्यक फौजदार एम एम शर्मा, महिला सहाय्यक फौजदार पूजा लाखात, पोलीस हवालदार कैलास शेळके, पोलीस हवालदार के एच केनी, महिला पोलीस नाईक सोळंके, पोलीस अमलदार चिमकर या पथकाने रविवार दिनांक 3 मे 2026 रोजी या बिल्डिंगमध्ये छापा टाकून खुदाबक्ष मोहम्मद शाहिद वय वर्ष (38 )मूळ राहणार हरिद्वार उत्तराखंड, आणि हिना जामीन अहमद वय वर्ष (35) उत्तर प्रदेश व एका विधी संघर्षित बालकाला 44 लाख 92 हजार दोनशे रुपयांच्या ब्राऊन शुगरच्या साठ्यासह अटक करून ताब्यात घेऊन सोमवारी पालघर कोर्टात हजर केले असता पालघर कोर्टाने त्यांना 8 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

तर यातील विधी संघर्षित बालकाची रवांगी बाल सुधार गृहात करण्यात आली आहे.याबाबत पुढील तपास सफाळे पोलीस ठाणे सहायक पोलीस निरीक्षक दत्ता शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button