शहर

३३ वर्षे ६ महिन्यांच्या प्रदीर्घ सेवेनंतर पोलीस उपनिरीक्षक नारायण भीमराव पाटील सन्मानाने सेवानिवृत्त

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640

कर्तव्यनिष्ठा, शिस्तप्रिय स्वभाव आणि जनतेशी आपुलकीपूर्ण वर्तन यासाठी ओळखले जाणारे पोलीस उपनिरीक्षक नारायण भीमराव पाटील दिनांक ३० एप्रिल २०२६ रोजी पोलीस दलातून सन्मानाने सेवानिवृत्त झाले आहेत .

तब्बल ३३ वर्षे ६ महिने त्यांनी पोलीस खात्यात निष्ठेने आणि प्रामाणिकपणे सेवा बजावत उल्लेखनीय कार्य केले आहे .दिनांक ०९ नोव्हेंबर १९९२ रोजी ठाणे ग्रामीण पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून त्यांनी आपल्या सेवेला सुरुवात केली. त्यानंतर पालघर जिल्ह्यातील कासा, वाहतूक शाखा, तलासरी, मनोर आणि डहाणू या विविध ठिकाणी त्यांनी जबाबदारीने कर्तव्य पार पाडत जनसेवेला वाहून घेतले.

आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात त्यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी, गुन्हेगारी नियंत्रणासाठी तसेच वाहतूक व्यवस्थापन सुरळीत ठेवण्यासाठी मोलाचे योगदान दिले. कठोर शिस्तीबरोबरच सर्वसामान्य नागरिकांशी नम्रतेने व आत्मीयतेने वागणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख कायम राहिली.

त्यांच्या सेवानिवृत्तीप्रसंगी सहकारी अधिकारी, कर्मचारी व नागरिकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. पोलीस दलातील त्यांच्या अतुलनीय सेवेसाठी सर्व स्तरांतून कृतज्ञता व्यक्त करण्यात येत आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button