क्राईम

सफाळे पोलीस ठाणे हद्दीतील तीन पत्ती जुगार आयोजकासह 14 जुगार्यांवर पालघर पोलिसांनी छापा टाकून केले गुन्हे दाखल

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक: 703051640

पालघर जिल्ह्यातील सफाळे पोलीस ठाणे हद्दीतील विठ्ठलवाडी गावातील एका व्यक्तीने आपल्या घराच्या पाठीमागे मंडप टाकून दोन दिवसीय जुगाराचे आयोजन केले होते.कारण या गावात 27 आणि 28 एप्रिल रोजी विठ्ठल रखुमाई मंदिराची यात्रा होती. या यात्रेच्या निमित्ताने आजूबाजूच्या परिसरातील जुगारी जुगार खेळण्यासाठी आयोजित केलेल्या खाजगी मंडपात जाऊन तीन पत्ती जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांना प्राप्त झाल्यावर पालघर पोलिसांनी मंगळवार दिनांक 28 एप्रिल रोजी मध्यरात्री घटनास्थळी धाड टाकली यावेळी या मंडपात जुगार खेळणारे अनेक इसम अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळावरून फरार झाले आहेत.

यापैकी सहा जुगाऱ्याना घटनास्थळी पालघर पोलिसांनी अटक करून जुगार मंडपातील रोख रक्कम जप्त केली आहे.अटक केलेल्या जुगार्यांकडून सफाळे पोलिसांनी अधिक चौकशी करून या मंडपाच्या आयोजकासह एकूण 14 जुगार्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. या जुगाराच्या आयोजकावर याआधीही आर्थिक गुन्हे शाखा पालघर यांनी कारवाई केली होती.याबाबत अधिक चौकशी आणि तपास सफाळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता शेळके करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button