महाराष्ट्र

​सोलापूर जिल्ह्यात पीपल्स रिपब्लिकन पार्टीला भगदाड; सोमनाथ भोसले, अमित कांबळेंसह शेकडो पदाधिकाऱ्यांचा ‘रिपब्लिकन सेनेत’ प्रवेश

​संपादक नौशाद मुलाणी Times 9 Marathi News Network

सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, पीपल्स रिपब्लिकन पार्टीला (PRP) मोठे खिंडार पडले आहे. पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ अरुण भोसले आणि जिल्हाध्यक्ष अमित कांबळे यांच्यासह जिल्हाभरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे सामूहिक राजीनामे दिले आहेत. या सर्व नेत्यांनी सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील ‘रिपब्लिकन सेना’ या पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.

​सामूहिक राजीनाम्यांनी कवाडे गटाला धक्का
​पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्याकडे आपले राजीनामे सोपवून या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. यामध्ये जिल्ह्यातील सर्वच आघाड्यांच्या प्रमुखांचा समावेश असल्याने जिल्ह्यात पीआरपीची मोठी पडझड झाली आहे.

​प्रवेश केलेले प्रमुख पदाधिकारी:
​सोमनाथ अरुण भोसले (युवक प्रदेशाध्यक्ष)
​अमित कांबळे (जिल्हाध्यक्ष)
​आशाताई रिकीबे (महिला आघाडी जिल्हाध्यक्ष)
​विश्वजीत सरवदे (युवक जिल्हाध्यक्ष)
​शरणु हजारे (सोलापूर शहराध्यक्ष)
​मेहबूब शेख (जिल्हा संपर्कप्रमुख)
​सद्दाम पठाण (मीडिया प्रमुख)
सह बारामती, माळशिरस, पंढरपूर, इंदापूर आणि अकलूज येथील तालुकाध्यक्षांसह शेकडो कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन सेनेचा झेंडा हाती घेतला.

​या प्रवेश सोहळ्यादरम्यान सोमनाथ भोसले यांच्या कार्याची दखल घेत सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी त्यांची रिपब्लिकन सेनेच्या (फादर बॉडी) राज्य सचिवपदी नियुक्ती जाहीर केली. ॲड. अमन आंबेडकर आणि प्रदेशाध्यक्ष डॉ. सुशील सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

​”डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी मी बांधील आहे. समाजातील वंचितांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि सोलापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात रिपब्लिकन सेनेचे संघटन मजबूत करणे हेच माझे आताचे ध्येय आहे. लवकरच उर्वरित सहकाऱ्यांच्या नियुक्त्या करून नव्या जोमाने कामाला सुरुवात करू.”
— सोमनाथ भोसले, नवनियुक्त राज्य सचिव, रिपब्लिकन सेना.

​भोसले यांच्या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण आणि घोषणाबाजी करत मोठा जल्लोष केला. सोलापूर जिल्ह्यात पीआरपीला बसलेला हा धक्का आणि रिपब्लिकन सेनेत झालेली ही इनकमिंग आगामी स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. सोमनाथ भोसले यांच्या या नव्या प्रवासामुळे जिल्ह्यातील सामाजिक परिवर्तनाला नवी दिशा मिळेल, अशी भावना समर्थकांकडून व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button