महाराष्ट्र

खंडाळीच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही: खा. धैर्यशील मोहिते-पाटील

​संपादक नौशाद मुलाणी Times 9 Marathi News Network

खंडाळी:”सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांच्या काळापासून खंडाळी गाव मोहिते-पाटील परिवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. या गावाची निष्ठा पाहून खंडाळीच्या सर्वांगीण विकासासाठी मी खासदार म्हणून भरीव निधी उपलब्ध करून देण्यास कटिबद्ध आहे,” असे प्रतिपादन माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी केले.

​खंडाळी (भोसलेवस्ती) येथे ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत विहीर खोदणे व विविध विकासकामांच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.कार्यक्रमात बोलताना खासदार मोहिते-पाटील पुढे म्हणाले की, मोहिते-पाटील कुटुंबातील प्रत्येक सदस्य खंडाळीच्या विकासासाठी नेहमीच तत्पर असतो. निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या पाठीशी आम्ही नेहमीच खंबीरपणे उभे आहोत. कार्यकर्त्यांनीही जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

​विहिरीच्या कामासाठी स्वतःची दोन गुंठे जागा विनामूल्य दान देणारे युवा शेतकरी नामदेव भोसले यांचा खासदारांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. सामाजिक बांधिलकी जपल्याबद्दल मोहिते-पाटील यांनी त्यांचे मनापासून आभार मानले.

​या कार्यक्रमास माजी सरपंच रावसाहेब भोसले, चेअरमन राजेंद्र पताळे, डॉ. सुभाष कटके-पाटील, बाबुराव कदम, सुरेश सुरवसे, उपसरपंच नितीन थोरात, गटनेते अमर रिसवडकर, अविनाश पताळे, नारायण पताळे, मदन भोसले, महेश पताळे, गणेश भोसले, नामदेव भोसले, शंकर जाधव, समाधान पताळे, ओंकार भोसले, ब्रम्हदेव मस्के, सोनू भोसले, धनाजी जाधव यांच्यासह खंडाळी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button