शहर

पालघर जिल्ह्यातील मोटरसायकल अपघातात सफाळे एडवण गावातील दोन तरुणांचा मृत्यू

                                                                              टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक: 7030516640      

पालघर जिल्ह्यातील सफाळे पश्चिम एडवण गावातील दोन मोटरसायकल स्वारांचा समोरासमोर ठोकर लागून जबरी अपघात झाल्यामुळे या अपघातात दोन तरुणांपैकी एकाचा जागीत मृत्यू झाला असून दुसऱ्याचा दवाखान्यात नेत असताना वाटेत मृत्यू झाला आहे.गुरुवार दिनांक 16 एप्रिल रोजी संध्याकाळी कुणाल तरे राहणार सफाळे एडवण वय वर्ष (32) हा आपल्या फॅशन प्रो दुचाकीवरून सफाळे दिशेने निघून आपल्या एडवण गावी कामावरून घरी परत येत होता याचवेळी विरुद्ध दिशेने एडवण येथून आपली दुचाकी घेऊन कामावर जाण्यासाठी निघालेला साईराम पुरोहित वय वर्ष (26) या दोघांची गुरुवारी रात्री 08.15 वाजता भादवे स्टॉप नंबर एक या मेन रस्त्यावर दुचाकीची जबरी ठोकर लागून झालेल्या अपघातात रक्तबंबाळ झालेल्या कुणालचा जागीच मृत्यू झाला तर साईराम पुरोहित याला उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना त्याचा रस्त्यात मृत्यू झाला आहे.

हे दोघेही भरधाव वेगाने व हेल्मेट चा वापर न केल्यामुळे या दोघांचा अपघाती मृत्यू झाला आहे.याबाबत सफाळे केळवा सागरी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक विजया गोस्वामी यांनी या भागातील नागरिकांना हेल्मेटचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button